नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (Tata Motors) टियागो एनआरजीच्या (Tiago NRG) एका नवीन व्हेरिएंटचा टीझर जारी केला आहे. नवीन व्हेरिएंट एक्सटी व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत, Tiago NRG फक्त टॉप-स्पेक XZ सह ऑफर केली जाते. Tiago NRG चा आगामी XT व्हेरिएंट टॉप-स्पेक व्हेरिएंटपेक्षा अधिक परवडणारा आणि स्वस्त असेल. टाटा मोटर्स येत्या आठवड्यात Tiago NRG लाँच करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Tiago च्या NRG व्हर्जनमध्ये फक्त कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामधील अतिरिक्त बॉडी क्लॅडिंग Tiago NRG ला रफ अँड टफ स्टांस देते. Tiago NRG रेग्युलर टियागोच्या तुलनेत 37 मिमी लांब आहे. अंडरपिनिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अतिरिक्त लांबी पुढील आणि मागील बाजूस अतिरिक्त बॉडी क्लॅडिंगसह येते.
टाटा मोटर्सने नियमित Tiago मॉडेलच्या तुलनेत NRG चे ग्राउंड क्लीयरन्स देखील वाढवले आहे. आता त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 181mm आहे, तर Tiago चे ग्राउंड क्लीयरन्स 170mm आहे. अतिरिक्त 11 मिमी ग्राउंड क्लिअरन्समुळे खडबडीत रस्ते चांगल्या प्रकारे हाताळण्यात हॅचबॅकला मदत मिळते. Tiago NRG XT बद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. यात Tiago XT सारखे काही फीचर्स मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र, नवीन व्हेरिएंट टॉप-स्पेक NRG प्रमाणेच कॉस्मेटिक टचसह येत राहील. बॉडी क्लेडिंग आणि ग्राउंड क्लियरन्स व्यतिरिक्त, Tiago NRG ला रूफ रेल देखील मिळते.
सध्याच्या मॉडेलपेक्षा कमी किंमतआगामी व्हेरिएंटमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केले जाणार नाहीत. NRG त्याच 1.2-लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे मिळेल, जे सध्याच्या मॉडेलला सामर्थ्य देते. हे इंजिन 84 bhp ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 5-स्पीड एएमटीसह येते. XT व्हेरिएंट AMT गिअरबॉक्ससह ऑफर केला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. Tiago NRG किंमत 6.82 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. XT व्हेरिएंटची किंमत यापेक्षा कमी असू शकते अशी अपेक्षा आहे.