Tata Nexon Dark EV Launch (Marathi News) : टाटा मोटर्सने (Tata Motors) नेक्सॉन डॉर्क आणि नेक्सॉन ईव्ही डार्क व्हर्जन लाँच केले आहे. नवीन एसयूव्ही शानदार लूक आणि स्टाइलमध्ये दिसत आहे. दरम्यान, नेक्सॉन डार्कची एक्स-शोरूम किंमत 11.45 लाख रुपयांपासून सुरू होते, तर नेक्सॉन ईव्ही डार्कची एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट डार्क एसयूव्ही क्रिएटिव्ह ट्रिम आणि फियरलेस ट्रिममध्ये मिळणार आहे. याचबरोबर, टाटा कंपनीने हॅरियर आणि सफारीची डार्क रेंजही लाँच केली आहे.
टाटा नेक्सॉन डार्क रेंजची किंमत ट्रिमच्या किमतीपेक्षा जवळपास 35,000 रुपये जास्त आहे. या कारच्या फीचर्समध्ये कोणताही बदल नाही. ज्या व्हेरिंएटवर डार्क एडिशन बेस्ड आहे, तशीच फीचर्स मिळतील. यामध्ये वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसाठी हिडन कॅपेसिटिव्ह टच पॅनल, ब्लॅक लेदर सीट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन नेक्सॉन 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्सनसह मिळणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड एएमटी किंवा 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटो ट्रान्समिशनसह मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 6 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनसह 1.5 लिटर डिझेल इंजिन ऑप्शन देखील आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशन ही नेक्सॉन ईव्हीच्या टॉप व्हेरिएंट एम्पॉवर्ड + LR ट्रिमवर आधारित आहे. या व्हेरिएंटच्या तुलनेत डार्क एडिशन जवळपास 10,000 रुपयांनी महाग आहे. नेक्सॉन ईव्ही डार्कला 40.5 kWh बॅटरी पॅकची पॉवर मिळेल. एकदा फुल चार्ज केल्यानंतर नेक्सॉन ईव्ही डार्क 465 किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल.
Tata Harrier Dark आणि Safari Darkटाटाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हॅरियर आणि सफारी या दोन फ्लॅगशिप एसयूव्हीचे डार्क एडिशन लाँच केले होते. आतापर्यंत त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हॅरियर डार्कची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे, तर सफारी डार्कची एक्स-शोरूम किंमत 20.69 लाख रुपये आहे. या दोन्ही एसयूव्ही 2.0 लिटर डिझेल इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात.