Tata Nexon Customer: टाटा मोटर्स ही देशातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी आहे. टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये Nexon आणि Punch आहेत. या कार त्यांच्या पॉवरफुल परफॉर्मंससाठी ओळखल्या जातात. परंतू, सोशल मीडियावर एका व्यक्तीने Nexon बाबत थेट रतन टाटा (Ratan Tata) यांच्याकडेच तक्रार केली. विशेष म्हणजे, समोरुन त्या व्यक्तीला उत्तरही मिळाले.
30 ऑक्टोबर रोजी सकाळी रतन टाटांनी एक ट्विट केले. या ट्विटचा टाटा मोटर्स किंवा टाटा मोटर्सच्या कुठल्याही कारशी काहीही संबंध नव्हता. पण, अभिषेक मगर नावाच्या ट्विटर हँडलवरून या ट्विटला उत्तर देताना Nexon ची तक्रार केली. त्या व्यक्तीने वडिलांची नेक्सॉन कार सातवेळा खराब झाल्याचे सांगितले.
त्याने लिहिले की, "सर कृपया टाटा मोटर्सवर लक्ष घाला. ग्राहकांना सदोष गाड्या विकत आहेत, मी त्यापैकी एक आहे. माझ्या वडिलांची टाटा नेक्सॉन 7 वेळा खराब झाली. ते अपंग आहेत. मी तुमच्याशी संपर्क साधला पण टीमने माझ्याशी बोलण्यास नकार दिला. कृपया याची नोंद घ्या."
टाटा मोटर्सचे उत्तर
प्रत्युत्तरात रतन टाटा यांनी ट्विट न करता टाटा मोटर्स कार्सने ट्विट केले, "हाय अभिषेक, आम्ही तुमची चिंता जाणतो. आमच्या टीमसोबत याची चौकशी करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही लवकरच अपडेट घेऊन तुमच्याशी संपर्क साधू," असे ट्विट कंपनीकडून आले.