Tata Nexon ही कार सेफ्टी फीचर्ससाठी आणि 5-स्टार GNCAP रेटिंगसाठी ओळखली जाते. देशातील टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी ही एक आहे. कारचे EV व्हेरियंट देखील भारतात खूप लोकप्रिय झाले आहे. अलीकडेच, नेक्स्ट जनरेशन Tata Nexon चे एक नवीन इलस्ट्रेशन ऑनलाइन समोर आले आहे. टाटा नेक्सॉन फेसलिफ्टच्या डिझाईनचा अंदाज यातून लावला जाऊ शकतो. हे सुंदर रेंडर इन्स्ट्राग्राम युझर shubhajit_dixit_ नं तयार केलंय.
नवीन रेंडर टाटा नेक्सॉनच्या डिझाइनला आकर्षक स्वरूप देते. यामध्ये नव्या टाटा लोगोसह एक स्टायलिश नवं फ्रन्ट फेसिया आहे. मागील पॅनलला समोरच्या प्रमाणेच डिझाइनसह स्टाइलिश टेललाइट्स देखील मिळतात. यामध्ये बेसिक फीचर्स सेमच आहेत. कारचे डिझाईन खूपच फ्युचरिस्टिकदेखील आहे. नवीन रेंडर ग्रीन आणि ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
काय आहेत फीचर्स?Tata Nexon बाजारात एकूण दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यात 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे देण्यात आलं आहे जे 120PS ची पॉवर आणि 170 Nm चा टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, त्याच्या डिझेल व्हेरिअंटमध्ये कंपनीने 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन वापरलं आहे, जे 110 PS ची पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. पेट्रोल आणि डिझेल सोबत ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
या कारमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत जे इतर मॉडेल्सपेक्षा या कारला चांगलं बनवतात. यात 7 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला कनेक्ट येते. या व्यतिरिक्त, डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर अॅडजस्टेबल आउट साइड रिअर व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम), कॉर्नरिंग फॉग लॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत.
किती आहे किंमत?ही एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप खास आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरसारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 7.28 लाख रूपयांपासून 11.89 लाख रूपयांच्या दरम्यान आहे. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 9.48 लाख रूपयांपासून 13.23 लाख रूपयांपर्यंत आहे. सध्या कंपनीनं या एसयुव्हीच्या डार्क एडिशन्सदेखील लाँच केल्या आहेत.