टाटा मोटर्सने आज मारुतीच्या पायाखालची वाळूच सरकवून घेतली आहे. टाटाने जबरदस्त बुटस्पेस असलेली अल्ट्रॉझ सीएनजी कार आणली आहे. या कारसाठी आजपासून बुकिंग सुरु केले आहे. लवकरच ही कार विक्रीसाठी लाँच केली जाणार आहे. मेपासून या कारची विक्री सुरु केली जाणार आहे.
Altroz iCNG साठी डीलरशिप आणि अधिकृत वेबसाईटवर 21,000 रुपये देऊन बुकिंग करता येणार आहे. Tata Altroz iCNG एकूण चार व्हेरिअंटमध्ये येणार आहे. यामध्ये XE, XM+, XZ आणि XZ+ हे व्हेरिअंट असणार आहेत. तसेच ही कार ऑपेरा ब्लू, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे आणि अॅव्हेन्यू व्हाइट असे चार रंग असणार आहेत. कंपनी Altroz CNG वर तीन वर्षांची किंवा 1 लाख किमीची वॉरंटी देणार आहे. कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही.
सीएनजी कार म्हणजे बुट स्पेस संपली, असे समीकरण आता बदलणार आहे. टाटाने ट्विन सिलिंडर दिल्याने मोठी बुटस्पेस मिळणार आहे. या कारमध्ये 1.2L Revotron बायो फ्युअल इंजिन देण्यात आले आहे. जे पेट्रोल मोडमध्ये 85bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर सीएनजीवर पॉवर आउटपुट 77 bhp पर्यंत मिळते. कारमध्ये 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करते.
याचबरोबर तुमच्या आवाजाने उघडझाक करणारा सनरुफ देण्यात आला आहे. 16-इंच अलॉय व्हील, स्टार्ट/स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट आणि मागील सीटसाठी एसी व्हेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये कारमध्ये दिली जाणार आहेत. टाटाची पंचही ड्युअल सिलिंडर तंत्रज्ञानाने युक्त असणार आहे.