नवी दिल्ली - टाटा मोटर्सने भारतात स्वस्त दरात एसयूवी चाहत्यांसाठी 'टाटा पंच'सारखा जबरदस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या वाहन खरेदीत टाटा पंचचा बोलबाला आहे. ग्राहकांचाही टाटा पंच खरेदी करण्याकडे कल असल्याचं दिसून येते. तुम्हीही चांगली आणि किफायतीशीर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा पंच उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वस्त दरात टाटा पंच खरेदी करू शकता.
ज्या ग्राहकांना एकसाथ पैसे देण्याऐवजी कर्ज घेऊन टाटा पंच खरेदी करायची आहे. त्यांनी केवळ १ लाख रुपये डाऊनपेमेंट करून कार घरी घेऊन जावू शकता. टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही ठराविक व्याजासह कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर EMI च्या रुपाने ती रक्कम दर महिन्याला तुम्हाला भरावी लागेल. टाटा पंच भारतात Pure, Adventure, Accomplished आणि Creative या ४ ट्रिम लेवलसह एकूण १८ व्हेरिएंट उपलब्ध केले आहेत. ज्याची किंमत ५.८३ लाखापासून ९.४९ लाखांपर्यंत आहे. ११९९ सीसी पेट्रोल इंजिन असलेली ही माइक्रो एसयूवी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही सुविधेसह उपलब्ध आहे. टाटा पंच माइलेज १८.९७ किमी प्रतिलीटर देते. टाटा पंचचा बेस मॉडेल एक्स शोरुम किंमत ५.८३ लाख इतकी आहे आणि रोड प्राइस ६.३९ लाख रुपये आहे. जर तुम्ही १ लाख डाऊनपेमेंटसह इतर रक्कम आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून करू इच्छित असाल तर तुम्हाला ९.८ व्याजदरासह पुढील ५ वर्ष दर महिन्याला ११ हजार ४०१ रुपये हफ्ता भरावा लागेल. टाटा पंच खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकचे १.४५ लाख व्याज भरावे लागेल.
टाटा पंच एडव्हेंचर कार लोन डाऊनपेमेंट आणि EMI तपशीलटाटा पंच एडव्हेंचर प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ६.६५ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत ७.४६ लाख रुपये आहे. जर तुम्ही १ लाख रुपये (प्रोसेसिंग फी तसेच रोड चार्जेस आणि पहिल्या महिन्याचा EMI) डाउन पेमेंट केल्यानंतर पंच एडव्हेंचरला आर्थिक सहाय्या घेतलं तर CarDekho EMI कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला ६,४६,२९२ रुपये आणि नंतर ९.८% व्याजदराने कर्ज मिळेल. यातून तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १३,६६८ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. टाटा पंच एडव्हेंचर व्हेरियंटला आर्थिक सहाय्य करण्यावर व्याज सुमारे १.७४ लाख रुपये असेल.