शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Tata Punch EMI: टाटा पंचसाठी २० टक्के डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI; जाणून घ्या गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 10:29 AM

वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे. 

टाटा मोटर्सला नेक्सॉननंतर टाटा पंच या छोट्याशा कारने मोठे यश मिळवून दिले आहे. ही मिनी एसयुव्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आली होती. पहिल्याच महिन्यात या कारची विक्री 8,453 युनिट एवढी झाली होती. वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे. 

टाटाच्या या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत 5,92,900 रुपयांपासून सुरु होते, तर टॉपचा काझिरंगा IRA ची किंमत 9,48,900 रुपये आहे. या कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. ही कार घ्यायची असेल तर बजेटमध्ये देखील आहे. तुम्ही २० टक्के डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला किती ईएमआय बसेल, याचे गणित जाणून घेऊया...बँक ऑफ बडोदा ऑटो लोनवर ७ टक्के व्याज आकारते. यासाठी १५०० रुपये प्रोसेसिंग फी घेते. एसबीआय ७.२० टक्के व्याज आकारते. अन्य बँकांचे व्याज ९ ते १० टक्क्यांवर जाते. हे व्याज ५ ते ७ वर्षांसाठी आकारले जाते. जर तुम्ही २० टक्के डाऊनपेमेंट केले तर उरलेल्या रकमेचे तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता. ७ वर्षांसाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. 

पंचच्या बेस व्हेरिअंटची किंमत 5,92,900 रुपये आहे. २० टक्के डाऊनपेमेंट 1,18,580 रुपये होते. एवढे पैसे दिल्यानंतर ८ टक्के व्याजदराने 4,74,320 रुपयांचे लोन घेतले तर तुम्हाला दर महिन्याला 7,393 रुपये ईएमआय पडेल. एकूण कर्जावर तुम्हाला 1,46,680 रुपयांचे व्याज मोजावे लागणार आहे. 

पंचचे टॉप व्हेरिअंट काझीरंगाची किंमत 9,48,900 रुपये आहे. 1,89,780 रुपये डाऊनपेमेंट केल्यास 7,59,120 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. यामुळे ७ वर्षंसाठी तुम्हाला 11,832 रुपयांचा ईएमआय बसतो. 2,34,752 रुपये तुम्हाला व्याज द्यावे लागेल. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिकमध्ये 18.82 kmpl मायलेज देते. 

टॅग्स :Tataटाटा