शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Tata Electric Cars : टाटा आणणार तीन नवीन इलेक्ट्रिक कार, रेंज मिळणार सुपरपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:19 PM

Tata Electric Cars : टाटाच्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहेत.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा बराच दबदबा आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक अवतारमध्ये आपले लोकप्रिय मॉडेल लाँच करणार आहे. टाटाच्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहेत.

Nexon EV चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केल्यानंतर आता Tata Harrier EV, Tata Punch EV आणि Tata Curvv EV लवकरच ग्राहकांसाठी मार्केटमध्ये आणल्या जाऊ शकतात. टाटा लवकरच ग्राहकांसाठी नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे, जे फुल चार्जवर अधिक रेंज ऑफर करतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, तीन आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्सबद्दल माहिती जाणून घ्या...

Tata Punch EVटाटा मोटर्सच्या या लोकप्रिय एसयूव्हीचे सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जन लाँच करण्यात आले असून आता लवकरच कंपनी या कारचा इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे. टेस्टिंग दरम्यान ही कार अनेक वेळा दिसून आली आहे, ही कार दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅटरीसह लाँच केली जाऊ शकते आणि या कारची ड्रायव्हिंग रेंज 300 ते 350 किलोमीटरपर्यंत असू शकते. सध्या कंपनीने या कारच्या लाँचिंग तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Tata Harrier EVकाही दिवसांपूर्वी टाटाने हॅरियरचे फेसलिफ्ट मॉडेल ग्राहकांसाठी लाँच केले आहे. आता कंपनी लवकरच ग्राहकांसाठी या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करू शकते. या एसयूव्हीमध्ये 60kWh ची बॅटरी दिली जाऊ शकते आणि या कारमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे.

Tata Curvv EVटाटाने यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये या कारचे पेट्रोल व्हेरिएंट दाखवले होते आणि आता या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची अपेक्षा आहे. या कारमध्ये उच्च क्षमतेची बॅटरी दिली जाईल, जी ग्राहकांना एका पूर्ण चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन