शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:14 PM

या महिन्यात कंपनीच्या Nexon EV, Punch EV आणि Tiago EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

नवी दिल्ली : सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारतात टाटा मोटर्स ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. टाटाच्या बॅटरीवर चालणाऱ्या कार टिकाऊपणाच्या बाबतीतही खूप चांगल्या आहेत. कार क्रॅश टेस्ट रँकिंगमध्ये टाटाच्या कारला चांगले सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, ग्राहकांनी जून २०२४ मध्ये टाटा ईव्ही खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते. या महिन्यात कंपनीच्या Nexon EV, Punch EV आणि Tiago EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

टाटा मोटर्स या महिन्यात आपल्या इलेक्ट्रिक कार रेंजवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहक एक्सचेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट ऑफर आणि ग्रीन बोनस अंतर्गत मोठ्या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांना ग्रीन बोनस मिळत आहे. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा इलेक्ट्रिक कारवर उपलब्ध असलेल्या ऑफर नक्की पाहू शकता.

Tata Punch EV वर दहा हजार रुपयांपर्यंत सूटतुम्ही जून २०२४ मध्ये Tata Punch EV खरेदी केल्यास तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. टाटाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वात कमी सूट फक्त Punch EV वर मिळत आहे. Punch EV दोन बॅटरी पॅकसह येते. या कारचे २५ kWh युनिट एका चार्जमध्ये ३१५ किमी अंतर कव्हर करते, तर ३५ kWh बॅटरी पॅक ४२१ किमी पर्यंतची रेंज मिळते. Tata Punch EV ची एक्स-शोरूम किंमत १०.९९ लाख ते १५.४९ लाख रुपये आहे.

Tata Tiago EV वर ५,००० रुपयांपर्यंत सूट Tata Tiago EV 2023 मॉडेल्सवर ९५,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याचबरोबर, २०२४ चे लाँग रेंज मॉडेल ७५,००० रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला मिड-रेंज वेरिएंट्सच्या खरेदीवर ६०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख ते ११.८९ लाख रुपये आहे.

Tata Nexon EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूटयाचबरोबर, तुम्ही Tata Nexon EV चे २०२३ मॉडेल १.३५ लाख रुपयांपर्यंतच्या सूटवर खरेदी करू शकता. २०२४ मॉडेल Nexon EV वर ८५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत १४.४९ लाख ते १९.४९ लाख रुपये आहे. ही ईव्ही ३०kWh बॅटरी पॅकवर ३२५ किमी आणि ४०.५ kWh बॅटरी पॅकवर ४६५ किमीची सिंगल चार्ज रेंज देते. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार