Tata Motors (टाटा मोटर्स) ने आयपीएल लिलावामध्ये मोठी घोषणा केली आहे. सर्वात छोटी फाईव्ह स्टार रेटिंगची कार टाटा पंचच्या स्पेशल एडिशनची एकमेव कार बनविली जाणार आहे. या कारचा आयपीएल २०२२ मध्ये लिलाव केला जाईल. ही कार ज्या व्यक्तीला मिळेल त्याच्याकडे अखंड भारतात अशी एकमेव कार असणार आहे.
टाटा पंचचे हे काझीरंगा स्पेशल एडिशन असणार आहे. कंपनी ही या एडिशनची एकच कार बनविणार आहे. नवीन मॉडेलच्या टॉप स्पेक 'क्रिएटिव' ट्रिम वर आधारित असेल. ही कार आगळ्या वेगळ्या अशा मीटियोर ब्रॉन्च रंगात लाँच केली जाईल. ही कार बऱ्याच अशी रेग्युलर टाटा पंच सारखीच दिसते. काझींरंगा हे अभयारण्य आहे, जे एका शिंगाच्या गेंड्यासाठी ओळखले जाते.
टाटा पंचच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ५ लाख ४९ हजार रुपयांपासून सुरू होते. यात अनेक जबरदस्त फिचर्स, रंगसंगती आणि आकर्षक डिझाइन मिळते. टाटा पंच कार एकूण चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात Pure व्हेरिअंटची किंमत ५.४९ लाखांपासून सुरू होते. Adventure व्हेरिअंटची किंमत ६.३९ लाख इतकी आहे. Accomplished व्हेरिअंटची किंमत ७ लाख २९ हजार रुपये आणि सर्वात टॉप मॉडल म्हणजेच Creative व्हेरिअंटची किंमत ८ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. टाटा पंचमध्ये १.२ लीटरचं रेवोट्रोन इंजिन देण्यात आलं आहे. यात ८६ पीएस पावर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. कार फाइव्ह स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पाच स्पीड एएमटी युनिट देखील मिळणार आहे.