गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झालेल्या टाटा पंच एसयूव्हीला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळात आहे. या SUV ची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.54 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. विक्रीचा विचार करता, ही कंपनीची नंबर 2 कार बनली आहे. ग्राहक नेक्सॉननंतर टाटाच्या याच गाडीची खरेदी करत आहेत. मात्र, आता लवकरच टाटा पंचचे टेन्शन वाढणार आहे. कारण मारुती आणि ह्युंदाई या दोन कंपन्या लवकरच आपली स्वस्त वाहने भारतीय बाजारात आण्याच्या तयारीत आहेत.
मारुती बलेनो क्रॉस -मारुती सुझुकी एक नवी सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणण्याच्या तयारीत आहे. जी Maruti Baleno हॅचबॅकवर आधारलेली असेल. ही कार जानेवारी 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. या एसयूव्हीचे नाव Maruti Baleno Cross असे असू शकते. ही कंपनीच्या Heartect प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. हिला 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय, एसयूव्हीला 1.2 लिटर पेट्रोल इंजिन अथवा 1.5 लिटरचे डुअलजेट पेट्रोल इंजिनसहदेखील सादर केले जाऊ शकते. हिची किंमत 8 लाख रुपयांपासून ते 11 लाख रुपयांदरम्यान असू शकेल.
Hyundai Mini SUV -माध्यमांतील वृत्तांनुसार, ह्युंदाई ऑटो एक्सपो 2023 मध्ये एक नवी मिनी एसयूव्ही सादर करू शकते. ही Hyundai Ai3 म्हणून ओळखली जाते. यात ह्युंदाई ग्रँड i10 चेच इंजिन दिले जाऊ शकते. ही देशातील सर्वात छोटी Hyundai SUV असेल. हिचे काही डिझाइन एलिमेंट्स आणि फीचर्स ह्युंदाई कॅस्परकडून घेतले जाईल. यात 1.2L पेट्रोल इंजिन असू शकते. जे 82bhp आणि 114Nm टार्क देईल. याशिवाय ही कार सीएनजी ऑप्शनसोबतही बाजारात उतरवली जाऊ शकते.