Tata Punch Camo Edition Launch: टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात लहान SUVचे म्हणजेच पंचचे कॅमो एडिशन (Tata Punch Camo Edition) लॉन्च केले आहे. कंपनीने याची किंमत 6.85 लाख रुपये (एक्स-शोरुम, नवी दिल्ली) ठेवली आहे. याचे रेगुलर मॉडेल गेल्यावर्षी लॉन्च केले होते. Tata Punch ला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.
या मॉडेलच्या वर्षपूर्तीनिमित्त कंपनीने पंच कॅमो एडिशन लॉन्च कले आहे. टाटा पंच कॅमो एडिशनच्या एक्टीरिअरवर ड्युअल-टोन कलर ऑप्शन (पियानो ब्लॅक आणि प्रिस्टिन व्हाइट) सिल्वर स्किड प्लेट्स, फ्रंट फेंडरवर कॅमो बॅजिंग आणि 16-इंच 'चारकोल' अलॉय व्हील्ससोबत नवीन फॉलीज ग्रीन पेंटजॉब मिळेल. याशिवाय, फॉग लाइट, एलईडी डीआरएल आणि एलईडी टेल लाइट्सदेखील देण्यात आले आहे.
टाटा पंच कॅमो एडिशनच्या इंटीरिअरमध्ये मिल्ट्री ग्रीन इंसर्ट मिळतात. यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी 7 इंच हरमन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे. कॅमो एडिशनमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि क्रूज कंट्रोलसारखे फीचर्सदेखील आहेत. हे मॉडेल MT आणि AMT, अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध केले असून, याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. टाटा पंच कॅमो एडिशन 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. ही 6,000 आरपीएमवर 86 पीएसची मॅक्सिमम पॉवर आणि 3,300 आरपीएमवर 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड एएमटी ट्रांसमिशनचा पर्याय देण्यात आला आहे.
Tata Punch Camo Edition च्या सर्व व्हेरिएंटची किंमत (एक्स शोरूम)
-- Punch Camo Edition Adventure MT: 6.85 लाख रुपये
-- Punch Camo Edition Adventure AMT: 7.45 लाख रुपये
-- Punch Camo Edition Adventure Rhythm MT: 7.20 लाख रुपये
-- Punch Camo Edition Adventure Rhythm AMT: 7.80 लाख रुपये
-- Punch Camo Edition Accomplished MT: 7.65 लाख रुपये
-- Punch Camo Edition Accomplished AMT: 8.25 लाख रुपये
-- Punch Camo Edition Accomplished Dazzle MT: 8.03 लाख रुपये
-- Punch Camo Edition Accomplished Dazzle AMT: 8.63 लाख रुपये