टाटा मोटर्स (TATA Motors) सध्या मारुती सुझुकीचे वर्चस्व असलेल्या सीएनजी पॅसेंजर वाहन (CNG Passenger Vehicle) सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कंपनी जानेवारी 2022 मध्ये 2 नवीन CNG कार्स Tiago CNG आणि Tigor CNG लाँच करण्याची तयारी करत आहे. काही टाटा डीलरशिपने सीएनजीवर चालणाऱ्या टियागो आणि टिगोरसाठी प्री-बुकिंगही सुरू केली आहे. मात्र, टाटा मोटर्सनं याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. येत्या आठवड्यात यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. Tiago आणि Tigor च्या CNG व्हर्जन यापूर्वी भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा चाचणी दरम्यान दिसल्या होत्या.
सीएनजी व्हेरिअंटमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. Tiago CNG आणि Tigor CNG रेग्युलर व्हेरियंटच्या लोअर आणि मीड लेव्हल रेंजमध्ये येण्याची अपेक्षा आहे. तथापि, नवीन मॉडेल्सबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Tata Tiago CNG व्हेरिअंटची Hyundai Santro CNG आणि मारुती Wagon R CNG यांच्याशी स्पर्धा असेल. त्याच वेळी, टिगोर सीएनजीची ह्युंदाई ऑरा सीएनजीशी स्पर्धा असेल. मारुती डिझायर सब-कॉम्पॅक्ट सेडानच्या सीएनजी प्रकारावर देखील काम करत आहे. टाटाच्या नव्या कार्सची किंमत सध्याच्या कारच्या तुलनेत ५० ते ६० हजारांपर्संत अधिक असू शकते.