ईलेक्ट्रीक कारच्या बाजारात आघाडी घेतलेल्या टाटाने सर्वात स्वस्त ईव्हीची किंमत वाढविली आहे. गेल्याच आठवड्यात टाटाने टियागो ईव्हीच्या डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली होती. यानंतर लगेचच किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे.
टाटा टियागो ईव्हीची किंमत २० हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. आता ही ईलेक्ट्रीक कार 8.69 लाख रूपयांपासून मिळणार आगहे. सर्व व्हेरिअंटच्या किंमती २० हजारांनी वाढविल्या आहेत.
टाटा टियागो ईव्ही ही देशातील ‘फास्टेट बुक ईव्ही’ बनली होती. पहिल्याच दिवशी १० हजार युनिट्स बुक करण्यात आले होते. महिन्याभरात हा टप्पा २० हजारांवर गेला आहे. सुरूवातीची किंमत १० लाख रूपयांपेक्षा कमी ठेवण्यात टाटा यशस्वी ठरली आहे.
टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑक्टोबर 2022 मध्ये आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) लाँच केली होती. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली होती. या किमतीचा लाभ पहिल्या 20 हजार ग्राहकांनाच मिळणार होता.
बॅटरी पॅक आणि रेंजटाटा टियागो ईव्ही XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार ट्रिममध्ये येते. कारला बॅटरी पॅक आणि चार्जिंग ऑप्शनच्या आधारावर विभागले गेले आहेत. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन 19.2kWh आणि 24kWh आहेत. 19.2 kWh ची बॅटरी फूल चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक फूल चार्ज केल्यावर 315 किमी पर्यंत रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.