शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 8:11 PM

Tiago EV : ही टाटा मोर्टर्सची (Tata Motors)तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्हीचे (Tiago EV) बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीकडून या कारबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्स या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. Tiago EV ही टाटा मोर्टर्सची (Tata Motors)तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.

कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्ही (Tigor EV) यांचा समावेश आहे. कंपनीने Tiago EV सह इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार चालवल्याने 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी कंपनीने तुलनात्मक डेटाही सादर केला.

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही या रेंजची पेट्रोल कार चालवत असाल तर हजार किलोमीटर चालवण्यासाठी तुम्हाला 7,500 रुपयांचे पेट्रोल लागेल. त्याचवेळी, Tiago EV ही कार 1000 किमी चालवल्यावर फक्त 1,100 रुपये खर्च येईल. अशाप्रकारे, समतुल्य पेट्रोल कारच्या तुलनेत तुम्ही 1000 किमी चालवून जवळपास 6,500 रुपये वाचवू शकता.

कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरूTiago EV चे बुकिंग 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21,000 रुपयांची टोकन रक्कम जमा करून Tiago EV कार बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असणार आहे. Tiago EV ही कार Ziptron टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

24kWh बॅटरी पॅक यासह अनेक चार्जिंग ऑप्शनग्राहकांच्या विविध गरजा समजून घेऊन, Tiago EV मध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि 24kWh बॅटरी पॅक यासह अनेक चार्जिंग ऑप्शन देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, Tiago EV मध्ये 24kWh बॅटरी पॅकसह 315 किमीची रेंज असणार आहे. टाटा मोटर्सने 19.2kWh च्या बॅटरी पॅकसह Tiago EV सादर केली आहे. या बॅटरी पॅकसह कारची रेंज 250 किमी असल्याचे सांगितले जाते. तसेच, मोटर आणि बॅटरी 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटरच्या वॉरंटीसह येईल, असे कंपनीने सांगितले आहे

बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षमयाचबरोबर, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि इनसाइट्सच्या आधारे, 24kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटला उत्पादन आघाडीवर प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षम आहेत. ते DC फास्ट चार्जर वापरून सुमारे 57 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. यामध्ये हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-मोड रीजन फीचरसह देखील दिले जात आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobile Industryवाहन उद्योग