शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'या' स्वस्त  CNG कारमध्ये मिळतील शानदार फीचर्स; i10 आणि Swift ला देतेय टक्कर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:05 IST

tata tiago nrg cng : आतापर्यंत कंपनीने विक्रीचे कोणतेही आकडे शेअर केलेले नाहीत, परंतु एका रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने नुकतेच टियागो एनआरजीचे (Tiago NRG) सीएनजी (CNG) व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लाँच केले. नवीन Tata Tiago NRG CNG भारतात 7.40 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Tiago आणि Tigor CNG लाँच केल्यानंतर टाटा मोटर्सच्या भारतीय पोर्टफोलिओमधील ही तिसरी सीएनजी कार आहे.

Tiago NRG चे सीएनजी मॉडेल सध्या खूप पसंत केले जात आहे. मात्र, आतापर्यंत कंपनीने विक्रीचे कोणतेही आकडे शेअर केलेले नाहीत, परंतु एका रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे ही कार अनेक मॉडर्न फीचर्स आहेत. ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये Hyundai i10 आणि Maruti Suzuki Swift ला टक्कर देत आहे.

शानदार फीचर्सकारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर Tata Tiago NRG च्या सीएनजी मॉडेलचे डिझाइन अगदी पेट्रोल मॉडेलसारखे आहे. नवीन कारमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रॉस-हॅचमध्ये हाय ग्राउंड क्लीयरन्स, खडबडीत बॉडी क्लेडिंग, रुफ रेल्ससह ड्युअल-टोन रुफ आणि चारकोल ब्लॅक इंटीरियर आहे. याशिवाय Tiago NRG मध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स इत्यादी लक्झरी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

पॉवरफूल इंजिनसीएनजी कारमध्ये 1.2-लिटर, तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिन वापरले जाते, जे Tiago आणि Tigor सीएनजीमध्ये काम करते. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 84 बीएचपी आणि 113 एनएम आणि सीएनजी मोडमध्ये 72 बीएचपी आणि 95 एनएम निर्मिती करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याची इंधन कार्यक्षमता अद्याप समोर आलेली नाही.

जाणून घ्या किंमत?टाटा मोटर्स Tiago NRG सीएनजी दोन व्हेरिएंट XT आणि XZ मध्ये विकत आहे. ज्यांच्या किंमती 7.40 लाख ते 7.80 लाख रुपये, एक्स-शोरूम आहेत. या कारची स्पर्धा मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओस सीएनजी इत्यादींसोबत होईल. जर तुम्ही नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तीनपैकी कोणतीही कार निवडू शकता. तिन्हींची किंमत जवळपास समान आहे.

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन