शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Tata कडून 6.42 लाख किमतीची नवीन कार लाँच; दमदार फीचर्स मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 2:38 PM

Tata Tiago NRG XT variant:  टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. 

टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या हॅचबॅक कार Tiago NRG चे नवीन XT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने Tata Tiago NRG XT व्हेरिएंटची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. 

आता एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने या कारचे नवीन व्हेरिएंट सादर केले आहे. टाटाने  फेसलिफ्ट Tiago NRG ला ऑगस्ट 2021 मध्ये  पुन्हा लाँच केले होते आणि ते फक्त पूर्णपणे लोडेड XZ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता एक नवीन परवडणारे व्हर्जन आहे, जे किंमत जवळपास 40,000 रुपयांपर्यंत खाली आणते.

असे आहेत XT व्हेरिएंटचे फीचर्स...Tiago NRG ने आपल्या नवीन XT व्हेरिएंटमध्ये 14-इंच हायपरस्टाईल व्हील, 3.5-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फ्रंट फॉग लॅम्प यांसारखी फीचर्स दिली आहेत. याशिवाय, 'रेग्युलर' टियागोच्या XT व्हेरिएंटला देखील 14-इंच हायपरस्टाईल व्हील, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि रिअर पार्सल शेल्फ सारख्या फीचर्ससह अपडेट केले आहे.

Tiago NRG आपल्या साइड क्लॅडिंग, ब्लॅक रुफ रेल, चारकोल ब्लॅक इंटीरियर कलर स्कीम आणि 181 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह अधिक तरुणांना आकर्षित करेल. हे साधारण टियागोपेक्षा 37 मिमी लांब आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 1.2-लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 84 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअलसह 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे.

नवीन Tata Tiago NRG XT व्हेरिएंटमध्ये ब्लॅक-आउट बी-पिलर, रिअर पार्सल शेल्फ, पॅसेंजरच्या बाजूला व्हॅनिटी मिरर आहेत. Tiago NRG गेल्या वर्षी सादर करण्यात आली होती. याला ऑगस्ट 2021 मध्ये अपडेट मिळाले होते. नेहमीच्या टियागोच्या तुलनेत यामध्ये शार्प हेडलॅम्प आणि वेगळ्या पद्धतीने डिझाइन केलेली ग्रिल मिळते. या कारचे पुढील आणि मागील बंपर देखील वेगळे दिसतात.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन