शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 4:32 PM

Techo Electra Emerge : ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये नव-नवीन फीचर्स कंपन्याकडून देण्यात येत आहे. अशाच एका टेको इलेक्ट्रा इमर्ज (Techo Electra Emerge) इलेक्ट्रिक स्कूटरबद्द्ल जाणून घेऊया. ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते.

Techo Electra Emerge Priceटेको इलेक्ट्रा इमर्ज इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 73,079 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड 76,730 रुपयांपर्यंत जाते.

Techo Electra Emerge Battery and Motorबॅटरी पॅक आणि मोटरबद्दल सांगायचे झाल्यास कंपनीने 60V, 30Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवला आहे. ज्यामध्ये 250W पॉवर असलेली बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. कंपनी या बॅटरी पॅकवर 1 वर्षाची वॉरंटी प्लॅन देते. बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 3 ते 4 तासांत पूर्ण चार्ज होते.

Techo Electra Emerge Range And Top Speedटेको इलेक्ट्रा इमर्जबद्दल, कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर 100 किमीची रेंज देते.

Techo Electra Emerge Braking and Suspensionया इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक लावण्यात आले असून रिअरमध्ये ड्रम ब्रेकसह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. स्कूटरमधील अलॉय व्हीलसोबत ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहे. सस्पेन्शन सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन जोडण्यात आले आहे. तर रिअलमध्ये ड्युअल मोनो सस्पेन्शन सिस्टीम जोडण्यात आली आहे.

Techo Electra Emerge Featuresया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स स्विच, सीटखाली 17.5 लीटर स्टोरेज, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आली आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन