भारतातील मारुती, ह्युंदाई आणि टाटा, यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी टोयोटा सातत्याने आपली स्थिती बळकट करण्यावर भर देत आहे. आता टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा ग्रुपच्या इतर कंपन्यांनी सांगितल्यानुसार, ते इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EVs) वापरल्या जाणार्या डिव्हईसचे स्थानिक पातळीवर उत्पादन घेण्यासाठी कर्नाटकमध्ये जवळपास 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स (टीकेएपी)च्या साथीने 4,100 कोटी रुपयांची गुंतवणून करणार आहे. तर आणखी एक कंपनी टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया (टीआयईआय) 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात, टीकेएम आणि टीकेएपीने शनिवारी कर्नाटक सरकारसोबत एका एमओयूवर स्वाक्षरी केली आहे.
टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. आम्ही हे 'गो ग्रीन, गो लोकल' या संकल्पनेतून करत आहोत. तसेच, प्रदूषण वेगाने कमी करण्याच्या मोहिमेत योगदान देणे हा आमचा उद्देश आहे.
गुलाटी म्हणाले, इव्ही डिव्हाईसचे स्थानिक पातळीवरील मॅन्युफॅक्चरिंग, इकोसिस्टमबरोबरच, नोकऱ्या आणि लोकल कम्युनिटीच्या डेव्हल्पमेंटलाही चालणा देईल. याशिवाय, TKM आणि TKAP मिळून सुमारे 3,500 नवीन रोजगार निर्माण करतील. याच बरोबर पुरवठा साखळी विकसित होण्याबरोबरच ही संख्या वाढेल.