टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अमेरिकेत झालेली भेट फलदायी ठरणार आहे. टेस्लाने भारतात आपले युनिट स्थापन करण्यासाठी लागणारी प्रक्रिया जोरात सुरू केली आहे. टेस्ला कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू झाली आहे. टेस्ला कंपनीने युनिटचे वार्षिक उत्पादन किती असेल याची संपूर्ण योजना तयार केली आहे. देशात किती रुपयांची कार असणार आहे. तसेच, सरकार आणि सामान्य लोकांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी टेस्लाच्या योजनेत आहेत.
काय आहे टेस्लाची योजना?इलॉन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपले युनिट स्थापन करण्यासाठी भारत सरकारशी बोलणी सुरू केली आहेत. या फॅक्टरीत टेस्ला 20 लाख रुपयांची कार तयार करण्याचा विचार करत आहे. टेस्लाचे हे युनिट एका वर्षात 5 लाख वाहने तयार करू शकणार आहे. दरम्यान, टेस्लाला इंडो पॅसिफिक प्रदेशात असलेल्या देशांमध्ये आपला व्यवसाय वाढवायचा आहे आणि टेस्ला वाहने तिथपर्यंत पोहोचवायची आहेत. यामुळेच टेस्लाने भारतात आपल्या उद्योग आणण्यास तयारी दर्शविली आहे. लवकरच चीनसोबत भारत देखील टेस्ला वाहनांचा प्रमुख निर्यातदार म्हणून उदयास येऊ शकतो.
स्थानिक उत्पादन आणि निर्यात दोन्हींचा समावेश एका सूत्राने सांगितले की, टेस्ला आपल्याकडे महत्वाकांक्षी योजना घेऊन आली आहे. आम्हाला खात्री आहे की यावेळी सर्व गोष्टी सकारात्मक होतील. ज्यामध्ये स्थानिक उत्पादन आणि निर्यात दोन्ही समाविष्ट आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय टेस्लासोबत चर्चा करत आहे. टेस्लासोबत सरकार अधिक चांगली डील करु शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. जूनमध्ये टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क म्हणाले होते की, कंपनी लवकरात लवकर भारतात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.