शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 12:24 PM

कंपनीने म्हटले आहे की, चीनमध्ये आधीच यावर काम सुरु आहे.

नवी दिल्ली : टेस्ला कंपनी भारतात सर्वात स्वस्त कार लाँच करण्यासाठी छोट्या बॅटरी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे बॅटरी आणि त्याची किंमत कमी केल्यास कार खूपच स्वस्त बनवता येते. मिंटच्या एका बातमीनुसार, टेस्लाने भारत सरकारसोबत छोट्या बॅटरी बनवण्याचा आपला इरादा शेअर केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, चीनमध्ये आधीच यावर काम सुरु आहे.

दरम्यान, लहान बॅटरीची एक समस्या अशी आहे की, फार लांबच्या अंतरापर्यंत प्रवास करता येणार नाही. त्यासाठी देशभरात बॅटरी चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क लागणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतात बॅटरी चार्जिंग स्टेशनची संख्या जवळपास 9300 आहे. जर आपण इतरांच्या तुलनेत पाहिले तर अमेरिकेत सुमारे 1,38,000 वाहन चार्जिंग स्टेशन आहेत.

लहान बॅटरीमध्ये एनर्जी स्टोरेज कमी असेल आणि त्यामुळे कार एका चार्जवर कमी अंतर प्रवास करू शकेल. उदाहरणार्थ, टेस्लाच्या मॉडेल 3 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 57.5 किलोवॅट-तास बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 435 किलोमीटरपर्यंत धावू शकते. दरम्यान, टेस्लाची ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची किंमत 40,000 डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 33 लाख रुपये होईल.

बॅटरी चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढवून बॅटरीची साइज कमी केली तर कारची किंमत बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. मिंटच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जर बॅटरीचा आकार कमी केला तर टेस्ला भारतात 20 लाख रुपयांपर्यंतची कार लाँच करू शकते. या किमतीत क्रेटा आणि XUV700 सारख्या कार भारतात विकल्या जातात.

लहान क्षमतेची बॅटरी दैनंदिन वापरासाठी योग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. साधारण कोणतीही व्यक्ती दररोज 400-500 किलोमीटर कार चालवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे. फास्ट चार्जिंग स्टेशनवर, देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन एक तासात 20 ते 80 टक्के चार्ज होते. यावर ही कार 200 किलोमीटरचा प्रवास करू शकते. तसेच, टेस्लाचा दावा आहे की, त्यांचे फास्ट चार्जिंग 15 मिनिटांत 230 किलोमीटरची रेंज देते.

भारतात टेस्ला कधी येणार?टेस्ला कंपनीच्या कार भारतात येण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर टेस्लाच्या भारतात प्रवेशाची चर्चा अधिकच जोर धरू लागली. या संदर्भात भारत सरकार आणि टेस्ला यांच्यात उच्च अधिकृत स्तरावरही चर्चा सुरू आहे. एका रिपोर्टनुसार, टेस्ला भारतात 2 बिलियन डॉलर्स किंवा 16000 कोटी रुपये अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. मात्र, कंपनीची अट आहे की, पहिल्या 2 वर्षांसाठी आयात केलेल्या कारवर शुल्कात सूट देण्यात यावी आणि केवळ 15 टक्के शुल्क वसूल केले जावे. दरम्यान, सध्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक कारवर 70-100 टक्के शुल्क आहे.

टॅग्स :Teslaटेस्लाAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर