अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने जगतीक पातळीवर आपल्या नावाचा एक विशेष दबदबा निर्माण केला आहे. तसेच, एलोन मस्क (Elon Musk) हेही कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या कंपनीच्या भारतात येण्यासंदर्भातही बरीच चर्चा सुरू आहे. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार्स अधिकाधिक चांगल्या बनविण्यासाठी सातत्याने नवनवे फीचर्स देत असते आणि यावेळी त्यांनी कारसोबत दिलेले एक फीचर फारच मनोरंजक आहे. या कारचे कलरलायझर कसे काम करते यासंदर्भात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
कसे काम करते हे फिचर - टेस्लाच्या कारमध्ये देण्यात आलेल्या या कलरलायझरच्या सहाय्याने यूजर इंफोटेनमेंट स्क्रिनवर आपला आवडता रंग निवडू शकतात. यानंतर जेव्हा ड्रायव्हर इतर फीचर्स अथवा नेव्हिगेशनचा वापर करतो, तेव्हा त्याला निवडण्यात आलेल्या रंगात ही सर्व माहिती मिळते. हा रंग एका कलर व्हीलच्या सहाय्याने क्षणात अनेक रंगांमध्ये बदलला जाऊ सकतो. एवढेच नाही, तर इंफोटेनमेंट स्क्रीनचा बदललेला रंग आपल्या मनानुसार दीर्घकाळापर्यंत सेव्ह केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, टेस्ला अॅपच्या सहाय्यानेही आपण या फिचरचा वापर करू शकता.
...तर कारही बदलते रंग?नाही, हे फीचर केवळ कॅबिनमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसाठीच देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमाने आपल्याला कारच्या बाहेरील भागाचा रंग बदलता येणार नाही. मात्र, बीएमडब्ल्यूने बाजारात अशी कार लॉन्च केली आहे, जी आपला रंग बदलते.
कंपनीची आयएक्स एम60 फ्लो एक इलेक्ट्रिक कार आहे. ही कार ड्रायव्हरला हवा असलेला रंग बदलते. या कारच्या बाहेरील बाजूस ई-इंकचे कोटिंग करण्यात आले आहे. जे कोट्यवधी मायक्रो कॅप्सूलच्या सहाय्याने आपला रंग बदलते. एक बटन दाबताच या कारचे हे मायक्रोकॅप्सूल आपला रंग बदलतात.