वॉशिंग्टन : टेस्ला मोटर्सने इलेक्ट्रीक कारच्या बाजारात क्रांती घडविली आहे. इतर दिग्गज कंपन्यांना स्वप्नातीत असलेल्या अद्ययावत सुविधा देवून तीन वर्षांत नाव कमावणाऱ्या या कंपनीने हॅकर्ससाठी मोठी योजना आणली आहे. मॉडेल 3 या कारची सुरक्षा प्रणाली हॅक करून दाखविणाऱ्याला कंपनी तब्बल 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच 7.10 कोटी रुपये बक्षिस म्हणून देणार आहे. शिवाय या कारचा पहिला मालक होण्याचा मानही हॅकरला मिळणार आहे.
टेस्ला मोटर्सने हॅकिंग कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. टेस्लाची मॉडेल 3 ही कार लाँच होणार आहे. टेस्लाच्या कॅनडातील वानकोवर येथील मुख्यालयामध्ये Pwn2Own 2019 च्या तीन दिवसीय सायबर सिक्युरिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मॉडेल 3 ही कार ठेवण्यात आली होती. या कारला जो हॅकर हॅक करेल त्याला घसघशीत बक्षिस देण्य़ाची घोषणा यावेळी कंपनीने केली आहे.
Pwn2Own हे एक कॉम्प्युटर हॅकिंग स्पर्धा आहे जिचे उंल्लरीू वेस्ट सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये आयोजन केले जाते. या स्पर्धेची सुरुवात 2007 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सॉफ्टवेअर आणि मोबाईल डिव्हाईसमध्ये कमतरता शोधण्यासाठी आव्हान दिले जाते. यामध्ये जिंकणाऱ्याला ते डिव्हाईस मिळतेच पण घसघशीत रक्कमही दिली जाते.
टेस्लाने ही स्पर्धा घेणाऱ्या संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे. जिंकणाऱ्याला कंपनीच्या वेबसाईवरही जागा दिली जाणार असून टेस्ला सिक्योरिटी रिसर्चर हॉल ऑफ फेम मध्ये त्याचा फोटो झळकणार आहे.