टेस्ला भारतात येण्याचे दरवाजे हळूहळू खुले होऊ लागले आहेत. अशातच टेस्लाची कार बंगळुरुच्या रस्त्यांवर दिसल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. टेस्लाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाऊ शकतो, त्याची घोषणा येत्या काही दिवसांत गुजरातमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.
बंगळुरुच्या कुब्बन पार्क मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक सिग्नलवेळी टेस्लाची Tesla Model X कार स्पॉट झाली आहे. या कारची नंबर प्लेटही भारतीय नाहीय. यीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. यामुळे टेस्ला भारतीय रस्त्यांवर टेस्ट ड्राईव्ह घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
एका युजरने सोशल मीडिया X वर अल्ट्रा-लाल रंगाच्या टेस्ला ईव्हीची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ही पोस्ट लागलीच व्हायरल झाली.काहींनी दुबईच्या नंबर प्लेटकडे लक्ष वेधले आणि ती टेस्ट ड्राइव्ह होती की काय अशी चर्चा सुरू झाली. कोणी म्हटले अशी वाहने चालवण्यासाठी मर्यादित कालावधीची परवानगी घेतली गेली असेल किंवा कोणी दुबईत नोंदणीकृत असलेली खासगी कार भारतात आणली असेल, असे म्हटले आहे.
टेस्ला भारतात २० लाखांपासून सुरु होणाऱ्या ईलेक्ट्रीक कार आणण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील टेस्लाच्या कार या कोटीच्या घरात असतात. भारतात रितेश देशमुख, अंबानी यांच्यासह काही मोजक्याच लोकांकडे टेस्लाच्या इंम्पोर्ट केलेल्या कार आहेत. परंतू, समान्यांना परवडणाऱ्या नाहीत. यामुळे टेस्ला बाजारात मोठा धमाका करण्यासाठी कमी फिचर्स, रेंजच्या कार आणण्याची शक्यता आहे.