किआ इंडिया (Kia India) ही देशातील टॉप-5 कार उत्पादकांपैकी एक आहे. Kia India ने नोव्हेंबर 2023 मध्ये जबरदस्त विक्री केली आहे. कंपनीच्या लोकप्रिय कारचीही बंपर विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील विक्रीच्या तुलनेत सकारात्मक आहे. सेल्टॉस नोव्हेंबर 2023 मध्ये ब्रँडसाठी स्टार परफॉर्मर ठरली आहे.
25.85% वृद्धी -नोव्हेंबर 2023 मध्ये सेल्टॉसने 11,684 यूनिट्सच्या विक्रीसह गेल्या वर्षीच्या 9,284 युनिट्सच्या तुलनेत 25.85% ची वृद्धी नोंदवली आहे. खरे तर विवीध घटकांमुळे या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने कस्टमर डिमांडचाही समावेश आहे.
सोनेट आणि कॅरेन्सच्या विक्रीत घसरण -या कालावधीत सोनेट आणि कॅरेन्स मॉडेलच्या विक्रीत घसरण झाली आहे. सोनेटच्या विक्रीत 17.88% ची घसरण दिसून आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 7,834 युनिट्सच्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये हिच्या 6,433 युनिट्सची विक्री झाली आहे. याच पद्धतीने कॅरेन्सच्या 4,620 युनिट्सची विक्री झाली आहे. जी नोव्हेंबर 2022 च्या 6,360 युनिटवरून 27.36% ची घसरण दर्शवते.
किआ EV6 -किआ EV6 च्या नेतृत्वात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 128 युनिट्सच्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये हिच्या केवळ 25 युनिट्सचीच विक्री झाली आहे. EV6 मध्ये 80.47% ची घसरण दिसून आली आहे.