सणासुदीच्या हंगामापूर्वी, कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी वाहन निर्मात्यांपर्यंत ऑटो कंपन्यांनी एक करार केला आहे. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करत असाल, तर आपल्याल 1.5-3.5% पर्यंतची सूट मिळेल. खरे तर, यामागे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मोठी भूमिका आहे.
लक्झरी कारवर मिळेल ₹25 हजारची सूट -टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहिती नुसार, काही टॉपच्या लक्झरी कार कंपन्यांनी जवळपास ₹25,000 चा डिस्काउंड देण्याचेही मान्य केले आहे. या शिवाय, इतर कंपन्यांनीही या डिस्काउंटसंदर्भात एक सीमा निर्धारित करावी, अशी अपेक्षा आहे.
नितीन गडकरी यंचा विशेष भर - ऑटो इंडस्ट्री आणि सरकार या योजनेची घोषणा करणार आहे. मार्च 2021 मध्ये स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासूनच, खरेदीदारांना त्यांची जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी डिस्काउंट आणि कमी जीएसटी सारखी सूट मिळायला हवी. यावर रस्ते वाहतुक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यंचा भर देत आहेत.
मंत्रालयने 2022 मध्ये दिला होता सल्ला, पण... -मंत्रालयाने ऑटोमोबाइल युनियन्सना 2022 मध्ये स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्रीच्या किंमतीवर 5% पर्यंत सूट देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, इंडस्ट्रीने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि एक असा डिस्काउंट नेगोशिएट करण्याचा निर्णय घेतला जो व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असले. सरकारने 60 रजिस्टर्ड वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीज आणि 75 ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशंस सेट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.