नवी दिल्ली : आपण गाडी कशी आणि किती वेळ चालवतो त्यानुसार आता विम्याचा हप्ता ठरणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) ‘पे ॲज यू ड्राइव्ह’ आणि ‘पे हाऊ यू ड्राइव्ह’ यांसारख्या टेलिमॅटिक्सवर आधारित मोटार वाहन विमा संरक्षणास मंजुरी दिली आहे. यामुळे एकाच पॉलिसीत बाईक्स आणि कार यांना विमा संरक्षण मिळू शकणार आहे.
फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य पॉलिसीपेक्षा थोडासा अधिक असेल. मात्र, अनेक पॉलिसी घेण्याच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल. इर्डाने सामान्य विमा कंपन्यांना ३ नवे ॲड-ऑन जोडण्याची परवानगी दिली आहे. पे ॲज यू ड्राइव्ह, पे हाऊ यू ड्राइव्ह व फ्लोटर पॉलिसी हे ते ॲड-ऑन आहेत. नियमित वाहन चालविणारे तसेच एकापेक्षा जास्त वाहने असणारे यांना नव्या नियमांचा फायदा होईल, असे वाहन विमा तज्ज्ञ अश्विनी दुबे यांनी सांगितले.
‘नो क्लेम बोनस’चा लाभवर्षभरात कोणताही दावा न करणाऱ्या विमाधारकास कंपनीकडून ‘नो क्लेम बोनस’’ (एनसीबी) मिळतो. तो २० टक्क्यांपासून सुरू होतो. तेवढा हप्ता कमी होतो. किरकोळ खर्च असल्यास दावा करण्याचे टाळा. नाही तर पुढील वर्षी एनसीबीसाठी अपात्र ठराल.
नवीन बदल काय ?सामान्य विमा कंपन्यांच्या प्रचलित ‘मोटर ओन डॅमेज’ (ओडी) कवचाला तंत्रज्ञान-सक्षम पूरकतेची जोडजितके वाहन चालविले जाईल आणि वाहनधारकाच्या वाहन-चालनाच्या वर्तनावर आधारित विम्याचा दर ठरवला जाणारएकाच्याच मालकीची दुचाकी व कार असेल तर, अशा ग्राहकाला दोन्ही वाहनांसाठी फ्लोटर पॉलिसी तुलनेने सवलतीच्या दरात मिळणारविमा हप्त्याबाबत पारदर्शकता आणली जाणार.