जगभरात नावाजली जात असलेली परंतू जास्त चर्चेत न येणारी कंपनी म्हणजे मर्सिडीज. आज बीवायडी, टेस्ला, फोर्ड, फोक्सवॅगन सारख्या कंपन्या सतत चर्चेत असतात. पण मर्सिडीज तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांनी चर्चेत असते. मर्सिडीजने भारतीय बाजारात EQ टेक्नोलॉजी वाली इलेक्ट्रीक जी वॅगन लाँच केली आहे. ही अशी कार आहे जी जागेवर ३६० डिग्री वळण्याची क्षमता ठेवते.
थोडक्यात सांगायचे तर मर्सिडीजची ही थार आहे, जी ऑफरोडिंगसाठी ओळखली जाते. मर्सिडीज G 580 ही खूप लोकप्रिय आहे, परंतू तिची किंमत एवढी आहे की सामान्य लोक ती फक्त दुरून पाहू शकतात. या कारच्या पहिल्या एडिशनची किंमत ३ कोटी रुपये आहे.
Mercedes G 580 मध्ये 117 kWh बॅटरी पॅक देण्यात आली आहे. पूर्ण चार्जवर ही कार 420 किमीची रेंज देते. तसे पाहिल्यास ही खूप मोठी रेंज नाहीय. परंतू, मजबूत मशीन म्हणून तिला अतिश्रीमंत लोक पसंती देऊ शकतात. यामुळे ही कारही फार म्हणजे फार कमी प्रमाणावर रस्त्यावर पहायला मिळू शकेल.
यात आणखी एक फिचर म्हणजे याचे ३६० डिग्री कॅमेरे चालकाला ऑफरोडिंग करताना आजुबाजुचे दृष्य कॅप्चर करून खड्डे, पाण्याच्या रस्त्याचे आकलन करून तिथून जाता येईल की नाही हे देखील सांगते. ही एसयुव्ही ८५० मिमी पर्यंत खोल पाण्यात जाऊ शकते. ३५ अंशांपर्यंतच्या जास्तीत जास्त तिरप्या जागेवरूनही चालू शकते. ४५ अंशांच्या चढावावर देखील चढू शकते आणि त्याचा उताराचा कोन २०.३ अंश, मागील कोन ३०.७ अंश आणि अप्रोच कोन ३२ अंश आहे.