मारुती ब्रेझा सध्याच्या घडीला देशातील प्रसिद्ध एसयुव्ही कारपैकी एक आहे. ब्रेझाची किंमत जवळपास ८ लाखांपासून सुरु होते. तर टॉप व्हेरिअंटची किंमत १४ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) जाते. ब्रेझा पाच सीटर कार आहे, तर त्याच किंमतीत तुम्हाला महिंद्राची एक्सयुव्ही ७०० (Mahindra XUV700) सारखी जबरदस्त एसयुव्ही मिळते.
Maruti Brezza च्या टॉप व्हेरियंटची किंमत 13.96 लाख रुपये एक्स-शोरूम आहे आणि XUV 700 च्या बेस MX व्हेरिएंटची किंमत 13.45 लाख रुपये आहे. सात सीटर व्यतिरिक्त, महिंद्रा ही एसयूव्ही 5 सीटर प्रकारात देखील विकते हे अनेकांना माहिती नाहीय. MX प्रकारात 5 सीटर आवृत्ती विकली जाते. ही कार भारतीय बाजारपेठेत MG Hector, Tata Harrier आणि Hyundai Creta सारख्या कारशी स्पर्धा करतो.
इंजिन आणि पॉवरमहिंद्रा एक्सयुव्ही ७०० मध्ये 2 लीटर टर्बो पेट्रोल (200PS आणि 380Nm) आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन (185PS आणि 450Nm) दोन्ही पर्याय मिळतात. डिझेल इंजिन साठी तुम्हाला 13.96 लाख रुपये मोजावे लागतील.
MX व्हेरिअंटची वैशिष्ट्ये
- टर्न इंडिकेटर्ससह ORVM पॉवर
- 8 इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले
- 7 इंच ड्रायव्हर डिस्प्ले
- अँड्रॉइड ऑटो
- एलईडी टेललॅम्प
- स्मार्ट डोर हँडल
- स्टीयरिंग माउंटेड स्विच
- 17 इंच स्टील व्हील