सणासुदीचे दिवस आहेत, ऑटो कंपन्या एकापेक्षा एक भारी डिस्काऊंट देत आहेत. त्यांच्याकडे हजारो कार मागणी शिवाय पडून आहेत. यामुळे या महिन्यात ऑटो कंपन्यांचा सेल वाढलेला दिसणार आहे. अशातच तुम्हाला रस्त्यावर देखील हार घातलेल्या, प्लॅस्टिक सीट कव्हर असलेल्या कार दिसणार आहेत. हे प्लॅस्टिक सीट कव्हर किती काळ ठेवायचे यालाही मर्यादा आहेत.
अनेकजण अशा प्रकारे सीट कव्हर महिनोंमहिने ठेवतात. जेव्हा फाटेल तेव्हा फाटेल असा विचार करतात. परंतू, असे करू नका. कार नवीन दिसते म्हणून अनेकजण कारण सांगतात.
मुळात कंपन्या सीटला प्लॅस्टिक कव्हर का लावून देतात त्याचे कारण समजून घ्या. कार डिलिव्हरी देताना सीटवर कोमतेही डाग पडू नयेत, फाटू नये किंवा नुकसान होऊ नये म्हणून कंपन्या ते कव्हर लावून देतात. तुम्हाला कार मिळते तेव्हाच त्याचे काम संपलेले असते. यामुळे कार घेताच ते कव्हर काढून टाकावे. नाहीत त्याचे नुकसान खूप आहे.
उन्हाळ्यात गाडीच्या सीटवर पॉलिथिनचे असल्याने गाडीचे तापमान जास्त गरम होते. सीटवर लावलेले पॉलिथिन कव्हर गरम झाल्यावर कॅडमियम आणि क्लोरीनसारखे हानिकारक वायू बाहेर पडतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. अनेक दिवस पॉलिथिन असल्याने त्यात धूळ आणि घाण साचते. कारच्या सीटवर पॉलिथिनच्या कव्हर्समुळे, तुम्हाला बसणे सोयीचे वाटत नाही. यासोबतच सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे.