देशीतील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने मे २०२४ मध्येही सर्वाधिक कारची विक्री केली आहे. महत्वाचे म्हणजे, मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या तब्बल ३ मॉडेल्सचा समावेश आहे, याशिवाय, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एका मॉडेलचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात मे २०२४ मध्ये विक्री झालेल्या मारुती सुझुकीच्या टॉप ३ कारसंदर्भात...
मारुती सुझुकी स्विफ्ट -मारुती सुझुकीची स्विफ्ट ही मे २०२४ मध्ये कंपनीचीच नव्हे तर, ओव्हरऑल सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मे महिन्यात या कारच्या एकूण १९,३९३ युनिट्सची विक्री झाली आहे. मे २०२३ चा विचार करता हा आकडा १७,३४६ युनिट्स एवढा होता. अर्थात या कारच्या विक्रीत एका वर्षात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, स्विफ्टला अलिकडेच एक अपडेट मिळाले आहे. यामुळे ही आत आता नवीन १.२-लिटर तीन-सिलेंडर इंजिनसह येते. जे ८०bhp जनरेट करते.
मारुती सुझुकी डिझायर -गेल्या महिन्यात मारुती सुझुकी डिझायर ही मारुतीच्या पोर्टफोलिओतील दुसोऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली. मारुतीने हिच्या १६,०६१ युनिट्सची विक्री केली. मे २०२३ चा विचार करता, तेव्हा हिच्या ११,३१५ युनिट्सची विक्री झाली होती. यानुसार या कारच्या विक्रीत तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिझायर १.२-लीटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. जे ८९bhp पॉवर जनरेट करते. यात सीएनजीचे ऑप्शनही मिळते. यावर इंजिन ७६bhp जनरेट करते.
मारुती सुझुकी वॅगन आर -ही कार विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या महिन्यात हिच्या एकूण १४,४९२ युनिट्सची विक्री झाली. तर मे २०२३ चा विचार करता, हिच्या एकूम १६,२५८ युनिट्सची विक्री झाली होती. अर्थात, हिच्या विक्रीत ११ टक्क्यांची वार्षिक घट झाली आहे. वॅगन आर ६६bhp च्या १.०-लीटर पेट्रोल इंजिन आणि ८९bhp च्या १.२-लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येते. सीएनजी ऑप्शनमध्येही ही कार उपलब्ध आहे.