मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोन्ही उद्योगपतींच्या व्यवसाय केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. या दोहोंच्याही गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. तर जाणून घेऊयात, दोघांच्याही ताफ्यातील सर्वात महागड्या कारसंदर्भात...
मुकेश अंबानींकडील Rolls Royce Phantom & Cullinan -मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce Phantom आणि Cullinan चा समावेश आहे. येथे या दोन कारचा उल्लेख केला आहे, कारण माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोन्ही कारची किंमत जवळपास 13 कोटी रुपेय (ऑन-रोड, कस्टमायझेशनसह) असल्याचे सांगण्यात येते. रॉल्स रॉयस कलिनन लक्झरी SUV आहे. ही कार अंबानी यांनी गेल्यावर्षीच अर्थात 2022 च्या शुरुवातीलाच खरेदी केली आहे.
याच बरोबर, मुकेश अंबानींकडे रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप देखील आहे. हिची किंमतही जवळपास 13 कोटी रुपये (ऑन-रोड, कस्टमायझेशनसह) सांगण्यात येते. या कारमध्येही जबरदस्त फीचर्स आहेत.
गौतर अदानींकडील Rolls Royce Ghost -माध्यमांतील वृत्तांनुसार, गौतम अदानी यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट सीरीजही सामील आहे. संभाव्यतः ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. हिचे एक्सटीरिअर आणि इंटीरिअर प्रीमियम आहे. यात 6.2-लीटर V12 इंजिन आहे. जे 5250 आरपीएमवर 563 एचपी आणि 1500 आरपीएमवर 780 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. भारतात हिची किंमत 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होते.
मात्र, वेगवेगळ्या कस्टमायझेशनसह हिची ऑन-रोड किंमत 10 कोटी रुपयांच्या जवळपासही जाऊ शकते. ही कार केवळ 4.8 सेकंदांत ताशी 0 ते 100 किमी एवढा स्पीड धारण करू शकते. हीची टॉप स्पीड ताशी 250 किमी एवढी आहे.