नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्या नवीन वर्षात येणार आहेत. कार खरेदी करण्याबाबत तुम्ही विचार करू शकता. जेणेकरून तुम्ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली कार निवडू शकता.
मारुती दोन कार लाँच करणार मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन एसयूव्ही कार लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या कार लाँच केल्या जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या नवीन एसयूव्ही कारमध्ये व्हायटीबी आणि 5-दरवाजा जिमनी लाइफस्टाइल एसयूव्ही यांचा समावेश आहे. व्हायटीबी एसयूव्ही कार एप्रिल 2023 पर्यंत लाँच केली जाऊ शकते आणि 5 डोअर कारची विक्री 2023 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित या कार (बलेनो क्रॉस किंवा व्हायटीबी मॅन्युअल) एएमटी युनिटसह 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिनवर धावणार आहेत.
टाटा मोटर्सच्या दोन कार येणार टाटा मोटर्स 2023 मध्ये हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करणार आहे. त्यामुळे कंपनी जानेवारीत 2023 ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन्ही मॉडेल सादर करू शकते अशी शक्यता आहे. या कारच्या नवीन मॉडेलच्या डिझाईन आणि इंटीरियरमध्ये बदल पाहायला मिळतात. नवीन हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कार अडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ने सुसज्ज असतील. ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन असिस्टंट यांसारख्या फीचर्ससह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळू शकते.
नवीन वर्षात लाँच होणार्या इतर कारची लिस्ट- टोयोटा एसयूवी कूपे- महिंद्रा थार 5 डोर- महिंद्रा एक्सयूवी 400- ह्युंदाई Ai3- ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट- किया सेल्टॉस फेसलिफ्ट- होंडा कॉम्पॅक्ट एसयूव्ही