इलेक्ट्रीक स्कूटर महाग आहेत, असे जर कोणी म्हणत असेल तर त्या प्रिमिअम कंपन्यांच्या स्कूटर महाग आहेत. इलेक्ट्रीक स्कूटरचे बरेचसे स्पेअरपार्ट हे आजही चीनमधून आयात होत आहेत. असे असताना त्यात छोडाफार क्वालिटीमध्ये फरक असू शकतो. आता लोकांचा इलेक्ट्रीक स्कूटरवर विश्वास बसू लागला आहे. गेल्या वर्षी जवळपास १० लाखांवर विजेवर चालणारी वाहने विकली गेली होती.
जर तुम्हालाही इलेक्ट्रीक स्कूटर घ्यायची असेल तर तुमच्यासाठी काही पर्याय आहेत, जे स्वस्त आहेत. ओला, टीव्हीएस, विडा सारख्या कंपन्यांच्या स्कूटर या महाग आहेत. परंतू अशा काही स्कूटर आहेत ज्या ५० हजारांत उपलब्ध आहेत. या स्कूटर तुम्ही दररोजच्या जवळच्या वापरासाठी घेऊ शकता.
यो एजजर तुम्हाला जवळचे जवळ चालवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही यो एज निवडू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरचा वेगही कमी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 60kms ची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. त्याची किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे.
अँपिअर रिओ इलाईटAmpere Reo Elite ची सुरुवातीची किंमत सुमारे 43,000 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. या स्कूटरमध्ये एलईडी डिजिटल डॅशबोर्ड, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल कॉइल स्प्रिंग शॉक ऑब्झर्व्हर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आदींचा समावेश आहे.
कोमाकी X150 हजार रुपयांच्या किमतीत येणार्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत कोमाकीच्या स्कूटरचाही समावेश आहे. तुम्ही Komaki X1 जवळपास Rs.45,000 मध्ये खरेदी करू शकता. ही स्कूटर एका चार्जवर 85 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.