Best Mileage Cars Under ₹3 lakh to ₹5 lakh: आपली एखादी कार असावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण त्यासाठीचं बजेटही तितकंच महत्त्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशा 10 कार्सबद्दल सांगणार आहोत ज्या 3 लाख ते 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. मारुती सुझुकी अल्टो ते मारुती सुझुकी एस-प्रेसो पर्यंतचा यात समावेश आहे. आम्ही तुम्हाला या गाड्यांचे मायलेज आणि किमतीबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही तुमच्या आवडीची कार स्वतः निवडू शकता. चला तर मग बघूया कोणत्या आहेत या कार्स.
भारतीय बाजारपेठेत 3 लाख ते 4 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तीन कार मिळत आहेत. यामध्ये मारुती सुझुकी अल्टो, डॅटसन रेडी गो आणि मारुती सुझुकी अल्टो के 10 यांचा समावेश आहे.
Maruti Suzuki Alto
3.39 लाख रुपये ते 5.03 लाख रुपये
मायलेज 22.05 kmpl पर्यंत
Datsun Redi Go
3,97,800 रुपये ते 4,95,600 रुपयांपर्यंत
मायलेज 22 kmpl पर्यंत
Suzuki Alto K10
3.99 लाख रुपये ते 5.83 लाख रुपयांपर्यंत
मायलेज 25 kmpl पर्यंत
4 ते 5 लाखांच्या बजेटमध्ये भारतीय बाजारपेठेत 7 कार्स उपलब्ध आहेत यामध्ये डॅटसन गो, मारुती सुझुकी एस्प्रेसो, डॅटसन गो प्लस, मारुती सुझुकी सेलेरिओ, मारुती सुझुकी ईको, रेनो क्विड आणि ह्युंदाई सँट्रो यांचा समावेश आहे.
Datsun Go
4,02,778 रुपये ते 6,51,238 रुपये
19 kmpl पर्यंत
Maruti Suzuki S-Presso
4.25 लाख रुपये ते 5.99 लाख रुपये
25.30 kmpl पर्यंत
Datsun Go Plus
4,25,926 रुपये ते 6,99,976 रुपये
19.02 kmpl पर्यंत
Maruti Suzuki Celerio
5.25 लाख रुपये ते 7 लाख रुपये
24.97 kmpl पर्यंत
Maruti Suzuki Eeco
4,63,200 रुपये ते 7,63,200 रुपये
16.11 kmpl पर्यंत
Renault Kwid
4,64,400 रुपये ते 5,99,000 रुपये
22 kmpl पर्यंत
Hyundai Santro
4,89,700 रुपये ते 6,41,600 रुपये
20.3 kmpl पर्यंत
(यामध्ये कारच्या बेस व्हेरिअंटपासून टॉप व्हेरिअंटपर्यंतच्या किंमती देण्यात आल्या आहेत. या सर्व एक्स शोरुम दिल्लीच्या किंमती आहेत.)