सध्या देशात पेट्रोलडिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा परिस्थितीत अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रूपयांच्या वरही गेले आहेत. तर डिझेलचे दरही आता मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे तुमचा कार चालवण्याचा खर्चही वाढला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीत थोडा बदल करून कारचं मायलेज वाढवू शकता.
कार उभी असल्यास बंद कराबऱ्याचदा असे दिसून येते की अनेक लोक रेड सिग्नलवर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कार उभी असताना इंजिन चालू ठेवतात. ही एक चुकीची सवय आहे. जर तुम्हाला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबवावे लागले तर इंजिन बंद करणे चांगले. अनेक वाहनांमध्ये ऑटो स्टार्ट / स्टॉपचा पर्यायदेखील येऊ लागले आहे, जे स्वतःच हे कार्य करते.
टायर प्रेशरकडे लक्षा द्याचांगले मायलेज मिळवण्यासाठी कारचे टायर प्रेशर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी त्याची तपासणी करत राहणे चांगले. आपल्या कारसाठी योग्य टायर प्रेशर ड्रायव्हरच्या दाराच्या आतील बाजूस देण्यात आलेलं असतं. टायर प्रेशरचे प्रमाण प्रत्येक कारसाठी वेगळे असते. आता अनेक वाहनांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमही येत आहे.
ड्रायव्हिंग करताना लक्ष ठेवावाहन चालवताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कार एकाच स्पीडने ठेवण्याचा प्रयत्न करा. गतीमध्ये अचानक वाढ आणि घट मायलेजवर परिणाम करते. आपल्याला गिअरची देखील काळजी घ्यावी लागेल. योग्य गियरवर योग्य वेगाने शिफ्ट करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला खूप वेगाने ब्रेक लावण्याची सवय असेल तर ती सुद्धा बदला.
असा करा एसीचा वापरकारमध्ये एअर कंडिशनर वापरल्याने मायलेज कमी होते. तेव्हा गरज नसताना AC बंद करा. यामुळे इंधनाची बचत होईल. जेव्हा एसी चालू असणे आवश्यक आहे, ते सामान्य तापमानावर सेट करा. ज तुम्ही हाय स्पीडवर गाडी चालवत असाल तर फ्युअल एफिशिअन्सी कमी होते.
वेळेवर करा सर्व्हिसिंगवर नमूद केलेल्या ड्रायव्हिंग टीप्स व्यतिरिक्त, कार सर्व्हिसिंग वेळेवर होणे देखील महत्त्वाचे आहे. इंधन आणि एअर फिल्टर, ल्युब्रिकंट, इंजिन ऑईल आणि इतर भाग नियमितपणे सेवा देत असल्याची खात्री करा. या भागांमधील कोणत्याही दोषामुळे इंधनाचा वापर वाढतो. या प्रकरणात, कोणत्याही प्रकारच्या टीप्स कार्य करत नाहीत.