Kia Cars in India: किआ मोटर्सने 2019 मध्ये तिच्या Seltos SUV सह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीने एकामागून एक 5 कार्स भारतात लाँच केली आहेत. किआ इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स, कार्निव्हल आणि EV6 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. जानेवारीमध्ये मारुतीपासून टाटा आणि मर्सिडीजपर्यंत कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यात आता किआ इंडियाचे नावही सामील झाले आहे. Kia आपल्या कारच्या किमती 50 हजार रुपयांनी वाढवणार आहे. याचे कारण पुढील वर्षापासून बीएस 6 फेज 2 नॉर्म लागू होणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये कॅरेन्स महागलीदिवाळीनंतर, Kia ने आपल्या 7 सीटर MPV कार Kia Carens ची किंमत वाढवली होती. त्यावेळी या एमपीव्हीची किंमत 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आली. किंमत वाढल्यानंतर, त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 17.99 लाख रुपये झाली होती. आता जानेवारीपासून ही कार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कॅटेगरीमधून बाहेर जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांतील संशोधनातून असे समोर आले आहे की, कोणत्याही वाहनाला जेव्हा लाँचपूर्वी टेस्ट केले जाते तेव्हा त्याचं एमिशनचा स्तर वेगळा असतो. परंतु जेव्हा वाहन वापरले जाते तेव्हा ते अधिक उत्सर्जन करू लागते. अशा परिस्थितीत ते पर्यावरणाला जास्त प्रमाणात हानी पोहोचवू लागते. याला आळा घालण्यासाठी भारत सरकार रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) मानक लागू करणार आहे. या अंतर्गत कार कंपन्यांना नवीन कारमध्ये सेल्फ डायग्नोस्टिक उपकरण बसवावी लागतील. या यंत्राद्वारे वाहनाचे उत्सर्जन सातत्याने ट्रॅक केले जाईल. हा नियम अनेक देशांमध्ये आधीच लागू करण्यात आला आहे. भारतात, ते 1 एप्रिल 2023 पासून लागू केले जातील.