2022 Maruti Suzuki S-Presso launched: मारुती सुझुकीने आपल्या मिनी SUV म्हणजेच S-Presso नवीन मॉडेल (2022) लाँच केले आहे. हे मॉडेल नेक्स्ट जनरेशन के-सीरीज 1.0-लिटर ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिनसह लॉन्च करण्यात आले आहे. कारमध्ये आयडल स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत याची फ्युअल एफिशिअन्सी अधिक झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
नवीन S-Presso चे Vxi(O) आणि Vxi+(O) AGS व्हेरिअंट 25.30 किमी प्रति लिटर, Vxi/Vxi+ MT 24.76 किमी आणि Std/Lxi MT 24.12 किमी इतकं मायलेज देईल. एवढेच नाही तर नवीन मॉडेलच्या सर्व AGS व्हेरिअंटमध्ये हिल होल्ड असिस्ट आणि ESP सह इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVM देखील देण्यात येणार आहेत.
किती आहे किंमत ?S-Presso च्या स्टँडर्ड एमटी व्हेरिअंटची किंमत 4.25 लाख एक्स शोरूम, एलएक्सआय एमटीची किंमत4.95 लाख, व्हिएक्सआय एमटी 5.15 लाख, व्हिएक्सआय + एमटी 5.49 लाख, व्हिएक्सआय (ओ) एजीएस 5.65 लाख आणि व्हिएक्सआय + (ओ) एजीएस व्हेरिअंटची किंमत 5.99 लाख एक्स शोरूम इतकी आहे.
कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यामध्ये कमांडिंग ड्राइव्ह व्ह्यू, डायनॅमिक सेंटर कन्सोल, अधिक केबिन स्पेस आणि अधिक ग्राउंड क्लियरन्ससह बोल्ड SUV सारखा एक्सटीरिअर मिळते.