डिसेंबर 2022 मध्ये हिरो स्प्लेंडर भारतातील सर्वाधिक विक्री झालेली मोटारसायकल ठरली आहे. या महिन्यात हिच्या एकूण 2,25,443 युनिट्सची विक्री झाली. खरे तर डिसेंबर 2021 च्या तुलनेत स्प्लेंडरचे 1,316 युनिट कमी विकले गेले आहेत. अर्थात, वार्षिक विक्रीचा विचार करता, हिच्या विक्रीत 0.58 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. मात्र असे असतानाही हिरो स्प्लेंडर सर्वाधिक विकली गेलेली बाईट ठरली. डिसेंबर 2021 मध्ये हिरो स्प्लेंडरच्या एकूण 2,26,759 युनिट्सची विक्री झाली होती. यानंतर, एचएफ डिलक्स ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली मोटारसायकल ठरली आहे.
सर्वाधिक विकली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची बाईक 'होंडा सीबी शाइन' - सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो, डिसेंबर 2022 मध्ये Honda CB Shine ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी बाईक होती. डिसेंबर 2022 मध्ये, Honda CB Shine चे एकूण 87,760 युनिट्स विकले गेले. त्याच्या विक्रीत वार्षिक 28.94 टक्के वाढ झाली. डिसेंबर 2021 चा विचार करता, या वर्षात तिचे 19,699 युनिट्स अधिक विकले गेले आहेत.
स्प्लेंडर आणि सीबी शाइनच्या विक्रीत फरक -होंडा सीबी शाइन ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली असली तरी, तिच्या आणि हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत मोठे अंतर आहे. CB Shine च्या तुलनेत, Splendor च्या 1.25 लाख पेक्षाही अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यामुळे दोघांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. Hero Splendor ची किंमत 72,076 रुपये ते 74,396 रुपयांपर्यंत आहे.