जेव्हा एखादी कार उत्पादक कंपनी आपली कोणतीही कार बाजारात आणते तेव्हा त्या कारची किंमत काय असावी हे एक मोठे आव्हान असते. किंबहुना, कारचे भवितव्य ठरवण्यात किंमत महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत अनेक वेळा कार उत्पादक कार बनवताना अनेक प्रकारची कॉस्ट कटिंग करतात, जेणेकरून ते कारच्या किंमतीवर नियंत्रण ठेवू शकतील. कार कंपन्यांच्या कॉस्ट कटिंगशी संबंधित काही सामान्य गोष्टी आपण पाहूया.
एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्यांचे अनेक भाग सारखेच असतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. उदाहरणार्थ मारुती सुझुकी बलेनो आणि मारुती सुझुकी ब्रेझा घ्या. दोघांचे इंटिरिअर अगदी सारखे दिसते. आतील अनेक भाग तसेच राहतात. याशिवाय मारुती सुझुकी ब्रेझा मध्ये जे इंजिन आहे तेच इंजिन Ertiga आणि XL6 मध्ये देखील आहे. असे का? कंपनीची इच्छा असेल तर प्रत्येक कारमधील प्रत्येक पार्ट नवीन आणि वेगळा देता येईल. पण, असे न करण्यामागे एक कारण आहे.
कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक कारचे सर्व भाग नवीन पद्धतीने बनवले तर त्याची किंमत वाढेल. कोणत्याही उत्पादनासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी भरपूर पैसा खर्च केला जातो, त्यानंतरच ते तयार केले जाते. कंपन्या एकसारखे पार्ट्स देऊन रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरील खर्च केलेले पैसे वाचवतात, ज्यामुळे त्यांना कारची किंमत नियंत्रित करण्यात मदत होते.
अन्य लहान मोठ्या गोष्टीआणखी अन्य अशा लहानसहान गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून कंपन्या कॉस्ट कटिंग करत असतात. अनेक कार्समध्ये फिक्स्ड हेड रेस्ट दिले जातात, त्यात ॲडजस्टेबल हेडरेस्ट नसतात. अनेक असे फीचर्सही असतात ते कारच्या त्या प्राईज रेंजमध्ये मिळणं आवश्यक असतं, पण कंपन्यांकडून ते दिलं जात नाही.