शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 12:08 PM

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे.

नवी दिल्ली : नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) गणेश चतुर्थी  (Ganesh Chaturthi) ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर हजारो रुपये वाचवू शकता. प्रोडक्ट डिस्काउंट व्यतिरिक्त कंपनी Ola S1 Pro, Ola S1X आणि Ola S1X Plus स्कूटरवरही उत्तम ऑफर देत आहे. विशेष म्हणजे या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. ओला गणेश चतुर्थी ऑफर (Ola Ganesh Chaturthi Offer) आज (7 सप्टेंबर) संपणार आहे. तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या ओला इलेक्ट्रिक डीलरकडे जाऊन तुम्ही स्कूटर बुक करू शकता. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे.

Ola S1 Pro Discountओला एस १ प्रो (Ola S1 Pro) ची किंमत १,३४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि या प्रो व्हेरिएंट इलेक्ट्रिक स्कूटरवर पाच हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटचा लाभ ओडिशा, केरळ, बंगळुरू, छत्तीसगड, म्हैसूर, मालेगाव, बेळगाव, नांदेड, कल्याण, परभणी, औरंगाबाद, बिदर, नागपूर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, नाशिक, ग्वाल्हेर, जयपूर, बरेली, मेहसाणा, दुर्ग, तिरुपती, पाटणा, सिवान, कोलकाता, उन्नाव, उदयपूर, दिब्रुगड, मुरादाबाद, झाझर, सिरोही, बालाघाट, अहमदाबाद, जुनागढ, राजकोट, सुरत, लखनौ, रायपूर, मेरठ आणि चंदीगड यासारख्या शहरांमध्ये मिळत आहे.

Ola S1X आणि S1X Plus पर सुद्धा सूटओला ए १ प्रो प्रमाणे, ओला एस १ एक्स (4kWh व्हेरिएंट) आणि एस १ एक्स प्लस मॉडेल्सवर देखील पाच हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे १, ०१,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आणि ८९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. या दोन्ही मॉडेल्सवर कुठे सवलत उपलब्ध आहे, याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ओला एस १ प्रो खरेदी करताना तुम्ही तुमची जुनी दुचाकी एक्सचेंज केल्यास तुम्हाला १२ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय, एस १ एक्सवर (4kWh व्हेरिएंट)  आठ हजार रुपयांचा बोनस दिला जात आहे. तसेच, तुम्हाला IDFC, RBL, Federal, Yes आणि One कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर ५ टक्के (५ हजार पर्यंत) सूट मिळेल, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे पेमेंट कराल तेव्हाच या ऑफरचा लाभ मिळेल. हे लक्षात घ्या ऑफर ९ महिने आणि त्याहून अधिक कालावधीसाठी आहे.

टॅग्स :AutomobileवाहनOlaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobile Industryवाहन उद्योगscooterस्कूटर, मोपेड