नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. गेल्या काही काळापासून कंपनीची तीन दरवाज्यांची एसयुव्ही मारुती सुझुकी जिम्नीचे (Maruti Suzuki Jimny) चर्चा होत होती. या एसयुव्हीची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Maruti Suzuki India Limited (MSIL) ने ३ डोअरची जिम्नी ऑटो एक्सपो 2020 मध्ये पेश केली होती. यानंतर या कारची वाट पाहिली जात आहे. (Maruti Suzuki's preparations for marketing the Jimny confirm launch in India. )
कधी लाँच होणार? कंपनीचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी कन्फर्म केले आहे की, ही जिम्नी कार लवकरच बाजारात येणार आहे. यासाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही.
मारुती जिम्नी भारतात 4 व्हील ड्राईव्ह सिस्टिमसह येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या कारची ऑफ रोडिंग क्षमता वाढणार आहे. 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळण्याची श्यक्यता आहे. हे इंजिन 100bhp ची ताकद आणि 130Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्हर्टर ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचे पर्याय असणार आहेत.
बॉक्सी प्रोफाईलवाली ही एसयुव्ही रग्ड स्टायलिंगसोबत येणार आहे. याच्या पुढे 5-स्लेट ग्रिल, सर्क्युलर एलईडी हेडलँम्प आणि ब्लॅक बंपर देण्यात आले आहेत. बॉडीच्या चारी बाजुंना ब्लॅक बॉडी क्लॅडिंग, बाहेर दिसत असलेले व्हील आर्च आणि रिअर माऊंटेड स्पेयर व्हील या एसयुव्ही मस्क्युलर लुक आणखी वाढवतो. या कारचे 5 डोअरचे व्हर्जन भारतात लाँच होण्याची चर्चा होत होती. कंपनीने परदेशात या कारची ऑफ रोड टेस्टिंग सुरु केली आहे. सध्या कंपनी जिम्नीच्या 3 डोअर व्हेरिअंटचे उत्पादन सुरु केले आहे.