Rules for Car Glass Film: अनेक लोक स्वॅग म्हणून कारच्या खिडक्यांवर काळी फिल्म लावतात. पण असे करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार, कारच्या काचांवर झिरो व्हिजिबलिटी असलेली काळी फिल्म लावल्यास चालान कापले जाते. हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत येते. पण, त्यानंतरही गाडीच्या काचा काळ्या करायच्या असतील, तर त्यासाठीही नियम आहे. नियमांचे पालन करून गाडीच्या काचा काळ्या करू शकता. वास्तविक, काचा पूर्णपणे काळ्या करू नयेत, असा नियम आहे. तथापि, ते काही प्रमाणात केले जाऊ शकते. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
सर्वोच्च न्यायालयानं मे २०१२ मध्ये टिंटेड ग्लासबद्दल एक निर्णय दिला होता. त्यानुसार कारच्या पुढे आणि मागील बाजूच्या काचेची व्हिजिबलिटी ७० टक्के असली पाहिजे. याचाच अर्थ ७० टक्के लाईट आत आली पाहिजे. तर साईडला असलेल्या काचांची व्हिजिबलिटी ५० टक्के असली पाहिजे.
तर कापलं जाईल चालानजर तुम्ही या निर्णयाचं उल्लंघन केलं तर पोलीस तुमचं चालान कापू शकतात. यासाठी जर तुमच्या मनात असेल की तुमच्या कारला काळी फिल्म लावावी तर त्यापूर्वी हा नियम जाणून घेणं आवश्यक आहे. नियमानुसार पुढील आणि मागील बाजूला ७० टक्के व्हिजिबलिटी असलेल्या आणि बाजूला ५० टक्के व्हिजिबलिटी असलेल्या फिल्म्स लावू शकता.