नवी दिल्ली : मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारमध्ये मारुती स्विफ्ट पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ वॅगनआर, ब्रेझा, बलेनो, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा, मारुती डिझायर, मारुती ईको, टाटा पंच आणि मारुती ग्रँड व्हिटारा यांचा क्रमांक लागतो. आता यामध्ये पाहिले तर 5 मॉडेल एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील आहेत. म्हणजेच मार्च 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप-10 कारमधील 50 टक्के मॉडेल्स एसयूव्ही सेगमेंटमधील आहेत. यावरून अंदाज लावता येतो की सध्या देशात एसयूव्हीची मागणी किती आहे.
- मारुती स्विफ्टने (Maruti Swift ) मार्च 2023 मध्ये 17,599 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 13,632 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत 29 टक्के वाढ झाली आहे.
- मारुती वॅगनआरने (Maruti Wagon-R ) मार्च 2023 मध्ये 17,305 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 24,634 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 30 टक्के घट झाली आहे.
- मारुती ब्रेझाने (Maruti Brezza ) मार्च 2023 मध्ये 16,227 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 102,439 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे.
- मारुती बलेनोने (Maruti Baleno ) मार्च 2023 मध्ये 16,168 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 14,520 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत 11 टक्के वाढ झाली आहे.
- टाटा नेक्सॉनने (Tata Nexon) मार्च 2023 मध्ये 14,769 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 14,315 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 3 टक्के वाढ झाली आहे.
- ह्युंदाई क्रेटाने (Hyundai Creta) मार्च 2023 मध्ये 14,026 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 10,532 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 33 टक्के वाढ झाली आहे.
- मारुती डिझायरने (Maruti Dzire) मार्च 2023 मध्ये 13,394 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 18,623 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 28% घट झाली आहे.
- मारुती ईकोने (Maruti Eeco) 2023 मध्ये 11,995 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 9,221 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे.
- टाटा पंचने (Tata Punch) मार्च 2023 मध्ये 10,894 युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये 10,526 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, विक्रीत 3 टक्के वाढ झाली आहे.
- मारुती ग्रँड व्हिटाराने (Maruti Grand Vitara) मार्च 2023 मध्ये 10,045 युनिट्सची विक्री केली आहे. त्यात गेल्या वर्षी (२०२२) मार्चमधील विक्रीचे कोणतेही आकडे नाहीत कारण ते तेव्हा विक्रीसाठी उपलब्ध नव्हते.
मारुती ग्रँड व्हिटारा पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये... मागचा मार्च हा पहिला महिना होता जेव्हा मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा टॉप-10 विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत स्थान मिळवू शकली. याआधी ग्रँड व्हिटाराची चांगली विक्री होत होती पण टॉप-10 कारमध्ये तिचा समावेश नव्हता. मात्र, मार्चमध्येही ती दहाव्या स्थानावर राहिली. ज्या कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये हे वाहन आहे, त्याच सेगमेंटची ह्युंदाई क्रेटा 14,026 युनिट्सच्या विक्रीसह टॉप-10 विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.