गेल्या ऑगस्ट महिन्यात यूटिलिटी व्हेइकल्स (एसयूव्ही आणि एमयूव्ही) च्या विक्रित सकारात्मक वृद्धी दिसून आली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा ही गेल्या महिन्यात 15,193 यूनिट विक्रीसह सर्वात वरच्या स्थानावर होती. ब्रेझानंतर टाटा नेक्सनचा क्रमांक होता. यापूर्वी ही कार गेली काही महिने टॉपवर होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात हिच्या केवळ 15,085 यूनिटची विक्री झाली. यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तसेच एसयूव्ही हुंडई क्रेटा ही तिसऱ्या स्थानावर होती. यापूर्वीच्या महिन्यात हिच्या 12,577 यूनिट्सची विक्री झाली होती. ऑगस्ट 2021च्या तुलनेत हिच्या विक्रीत 0.1 टक्क्यांची घट झाली आहे.
चौथ्या आणि पाचव्या स्थानावर टाटा पंच आणि मारुती सुझुकी ईको यांचा क्रमांक लागतो. या कारच्या प्रत्येकी 12,006 यूनिट आणि 11,999 युनिट विकले गेले आहेत. ईकोच्या बिक्रीत वर्षाला 12 टक्क्यांची वृद्धी दुसून आली आहे. Hyundai Venue आणि Maruti Suzuki Ertiga सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहे. यांच्या अनुक्रमे 11,240 आणि 9,314 युनिट्सची विक्री झाली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये व्हेन्यूचे 8,377 युनिट्स विकले गेले आहे. तसेच, मारुती सुझुकी अर्टिगा चे 6,251 युनिट्स विकले गेले होते. Hyundai Venue आणि Maruti Suzuki Ertiga ने अगस्त 2022 मध्ये प्रत्येकी 34 टक्के आणि 49 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे.
ऑगस्ट 2022 मधील टॉप-10 सर्वाधिक विकलेल्या यूटिलिटी व्हेइकल्सच्या यादीत किआ सेल्टोस, महिंद्रा बोलेरो आणि किआ सॉनेट यांचा अनुक्रमे 8वा, 9वा आणि 10वा क्रमांक लागतो. यांचे अनुक्रमे 8,652 युनिट्स, 8,246 युनिट्स आणि 7,838 युनिट्स विकले गेले आहेत. या तीनही मॉडेल्सच्या विक्रीत दरवर्षी वृद्धि दिसून येत आहे. महिंद्रा बोलेरोच्या विक्रीवर तर 156 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.