नवी दिल्ली : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. ही संधी पाहून जगभरातील अनेक नामांकित कार कंपन्या आपल्या लोकप्रिय वाहनांचे इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारात आणत आहेत, तसेच त्यांचे उत्पादनही पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे.
सध्या, बहुतेक इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी अधिक वेळ घेतात आणि इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, टेक्निकल सुधारणा करून ही समस्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दम्यान, आम्ही तुम्हाला सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या काही इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. पुढील प्रमाणे आहेत, 5 सर्वात वेगवान चार्जिंग होणाऱ्या इलेक्ट्रिक कार...
Porsche Taycan Plusजर्मनीच्या स्पोर्ट्स कार निर्मात्या पोर्शची पहिली इलेक्ट्रिक कार पोर्श टायकन प्लस (Porsche Taycan Plus) आहे. ही जगातील सर्वात वेगवान चार्जिंग कार आहे. ही कार सर्व उत्कृष्ट आणि आधुनिक फीचर्ससह सुसज्ज आहे आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये या कारने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे. ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1 हजार किलोमीटरहून अधिक धावू शकते.
Kia EV6 Long Range 2WDजगातील दुसरी सर्वात वेगवान चार्जिंग इलेक्ट्रिक कार किआने (Kia)तयार केली आहे. ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1,046 किमी आणि एसी चार्जिंगमध्ये 51 किमी जाऊ शकते.
Mercedes EQS 580 4MATICलक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीजची (Mercedes)ही कार चार्जिंगच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची कार आहे. ही कार एसी चार्जिंगमध्ये एका तासात 53 किमी आणि डीसी चार्जिंगमध्ये 788 किमी धावू शकते.
Tesla Model Yटेस्ला (Tesla) या सुप्रसिद्ध कंपनीची मॉडेल Y इलेक्ट्रिक कार जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही कार एसी चार्जिंगसह एका तासाच्या चार्जिंगवर 54 किमी धावू शकते आणि डीसी चार्जिंगसह 1 तासाच्या चार्जिंगमध्ये सुमारे 595 किमी धावू शकते.
Hyundai Ioniqह्युंदाईची (Hyundai) कार सुपरफास्ट चार्जिंग इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एसी चार्जिंगच्या एका तासावर 59 किमी धावण्यास सक्षम आहे आणि डीसी चार्जिंगसह ती 1 तासाच्या चार्जिंगवर 933 किमीची रेंज मिळवू शकते.