नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींवर जवळपास 2 वर्षे परिणाम झाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हळूहळू आर्थिकचक्र रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री देखील हळूहळू पुन्हा गती घेत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक वाहने बाजारात आली आहेत. भारतात अनेक नवीन प्रोडक्ट लाँच करण्यात आले तर अनेक जुन्या वाहनांच्या फेसलिफ्ट व्हर्जन सुद्धा दिसून येत आहेत. आता जुलै महिना संपत आला आहे, त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी ऑगस्टमध्ये लॉन्च होणार्या काही कारची माहिती घेऊन आलो आहोत.
New-gen Hyundai Tucsonनवीन चौथ्या जनरेशनची Hyundai Tucson भारतात 4 ऑगस्ट 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये लेव्हल-2 ADAS सह अनेक नवीन फीचर्स आहेत. Tucson मध्ये 2.0-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड आणि 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल.
Toyota Urban Cruiser Hyryderटोयोटा आपली ऑल-न्यू मिड-साइज एसयूव्ही अर्बन क्रूझर हायरायडरला 16 ऑगस्ट रोजी लाँच करू शकते. यामध्ये माइल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड असे दोन ऑप्शन मिळतील. दोघांमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल.
Maruti Suzuki Grand Vitaraमारुती सुझुकी ग्रँड विटारा ऑगस्टमध्येच लाँच होऊ शकते. मात्र, याच्या लाँच डेटबाबत माहिती मिळालेली नाही. ही कंपनीने 20 जुलै रोजी सादर केली होती. या कारला तीच पॉवरट्रेन मिळेल, जी तुम्हाला अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये मिळेल.
New-gen Maruti Suzuki Altoमारुती सुझुकी नवीन पिढीची अल्टो लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही 18 ऑगस्ट रोजी लाँच केली जाऊ शकते. यात डिझाइन अपडेट्स आणि नवीन फीचर्स मिळतील. दोन इंजिन पर्याय देखील दिले जाऊ शकतात.
Mercedes-AMG EQS 53ऑल-न्यू Mercedes-AMG EQS 53 4Matic+ हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रिक सेडान 24 ऑगस्ट 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर असतील. ही 107.8 kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते.