पुण्यातील इलेक्ट्रीक टुव्हीलर कंपनी Tork Kratos ने बाईकच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो कंपन्यांनी सातत्याने दरवाढ केली आहे. यातून आता इलेक्ट्रीक कंपन्यादेखील दूर राहिलेल्या नाहीत. टॉर्क कंपनी येत्या १ जानेवारीपासून बाईकच्या किंमती वाढविणार आहे.
या किंमत वाढीमुळे क्रेटॉसच्या पहिल्या वर्जनची किंमत 1,32,499 रुपये झाली आहे. तर वरच्या व्हेरिअंटची किंमत 1,47,499 रुपये झाली आहे. या किंमती महाराष्ट्रातील एक्सशोरुम किंमती आहेत. किंमती वाढण्यामागील एकमेव कारण म्हणजे त्याची इनपुट कॉस्ट आहे. महागाईचा मोठा भाग आम्ही गेल्या काही काळापासून सहन करत होतो, परंतू आता ते शक्य नाहीय. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटारसायकलींच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये टॉर्कने क्रेटॉस ही बाईक लाँच केली होती. त्यानंतरची ही पहिलीच दरवाढ आहे. टॉर्क मोटर्सने अलीकडेच वापरलेल्या दुचाकी खरेदी आणि विक्री प्लॅटफॉर्म CredR च्या सहकार्याने आपला एक्सचेंज प्रोग्राम सादर केला आहे.
बॅटरी आणि रेंज...मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ही मोटरसायकल १०० किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे.
फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत.