एम्बेसेडर बंद होऊन एक दशकापेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र, आजही ही कार अनेकांकडे सुस्थितीत दिसते. नुकताच या कारचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ही कार मॉडिफाय केलेली दिसत आहे. एम्बेसेडरचे हे मॉडेल सुमारे 42 वर्षे जुने असल्याचे सांगितलं जात आहे. तब्बल आठ लाख रुपयांचा खर्च करून त्यात बदल करण्यात आले आहेत. यात लाईट्स, अलॉय व्हील्स, स्टियरिंग, एसी नॉब्स, इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो, लेदर अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिकली ORVM यासह अनेक बदल करण्यात आले आहेत. कर्नाटकातील मंगलोर येथील केएएम कस्टमायझेशन हाऊसनं ही कार मॉडिफाय केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
कारच्या मॉडिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, याला निओ-रेट्रो लूक देण्यात आला आहे. त्यासाठी कारची फ्रन्ट ग्रिल बदलून नवीन ग्रिल फिक्स करण्यात आलेय. ग्रिलच्या मध्यभागी एका पट्टीवर AMBASSADOR लिहिलेले आहे. यात निश्चित एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये बॉम व्हाईट कलरचे एलईडी फॉग लॅम्प बसवण्यात आले आहेत. हे ब्लिंक, रेग्युलर ऑन सारख्या फीचर्ससह देखील येतात. कारचे डोअर हँडल, फ्युएल फिलर कॅप यासारखे भागही बदलण्यात आले आहेत. कारला डोअर-माउंटेड इलेक्ट्रिकल ORVM, 5-स्पोक अलॉय व्हील, कस्टम एलईडी टेललॅम्प, कस्टम पेंट जॉब मिळते.
कसं आहे इंटिरिअर?नव्या एम्बेसेडरच्या इंटिरिअरबद्दल सांगायचं झालं तर यात 5 ऐवजी 4 लोकांना बसायची जागा आहे. मागील सीट काढून त्या ठिकाणी दोन कॅप्टन सीट बसवण्यात आल्या आहेत. तर समोरील सीट्स इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल आहेत. यामध्ये कस्टम-मेड डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोलचा वापर करण्यात आला आहे. याचं स्टेअरिंग महिंद्रा स्कॉर्पिओच्या फेसलिफ्ट व्हर्जनवरून घेतल्याप्रमाणे वाटत आहे. यात महिंद्रा थार सारखे बदल देखील पाहायला मिळतात. एसी व्हेंट्स, लेटर अपहोल्स्ट्री, पॉवर विंडो, पुश बटण स्टॉप/स्टार्ट सिस्टम, आफ्टरमार्केट गियर लीव्हर सारखे बदल करण्यात आलेत. यासोबत यात मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह पायोनियर ऑडिओ सिस्टम देण्यात आलीये.