शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

टोयोटाने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या, आता खर्च करावे लागतील 77 हजार रुपये जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 8:41 AM

Toyota Fortuner, Innova Price : किमती वाढल्यानंतर इनोव्हा क्रिस्टाच्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे.

नवी दिल्ली : टोयोटाच्या (Toyota) एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड आहे. यात इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) आणि फॉर्च्युनरची (Fortuner)बरीच विक्री आहे. मात्र आता कंपनीने या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या किमतीत 23,000 रुपयांनी आणि फॉर्च्युनरच्या किमतीत 77,000 रुपयांनी वाढ झाली आहे.

Innova Crysta ची किंमतकिमती वाढल्यानंतर इनोव्हा क्रिस्टाच्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंट ZX AT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत आता 23.83 लाख रुपये झाली आहे. दुसरीकडे, इनोव्हा क्रिस्टाची डिझेल व्हर्जन आता 19.13 लाख ते 26.77 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

Fortuner ची किंमतकिमतीत वाढ झाल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरच्या 2.7L पेट्रोल 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन,  7-सीटर व्हेरिएंटची किंमत 32.59 लाख रुपये आणि त्याच मॉडेलच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटची किंमत 34.18 लाख रुपये झाली आहे. तसेच, टोयोटा फॉर्च्युनरची 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन, डिझेल व्हेरिएंटची किंमत 35.09 लाख रुपये आणि 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 37.37 लाख रुपये आहे. त्याच्या डिझेल इंजिनसह 4X4 मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत आता 38.93 लाख रुपये आहे आणि त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत आता 41.22 लाख रुपये झाली आहे.

Fortuner Legender ची नवीन किंमतफॉर्च्युनर लिजेंडरची (Fortuner Legender) 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जीआर स्पोर्टच्या किंमतीत 77 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, आता त्यांची नवीन किंमत अनुक्रमे 42.82 लाख, 46.54 लाख आणि 50.34 लाख रुपये झाली आहे.

कॅमरी आणि वेलफायरच्या किमतीही वाढल्या टोयोटाने आपल्या सेडान आणि एमपीव्ही सेगमेंट कारची किंमत 90,000 रुपयांवरून 1,85,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या वाढीनंतर कॅमरी हायब्रिडची किंमत आता 45.25 लाख रुपयांवर गेली आहे आणि वेलफायर हायब्रिडची नवीन किंमत 94,45,000 रुपयांवर गेली आहे.

टॅग्स :ToyotaटोयोटाAutomobileवाहन